Amravati Lok Sabha Constituency : ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन : डाॅ. राजेंद्र गवई

गवई म्हणाले आम्ही दिल्लीला जाणार नाही, आम्हाला तिकीट द्यायची असेल तर आम्हाला घरीच (आमच्या मतदारसंघात) द्या अन्यथा आम्ही काय करु शकताे याचा तुम्हांला अनुभव येईल.
ramdas athawale, prakash ambedkar, jogendra kawade rajendra gawai
ramdas athawale, prakash ambedkar, jogendra kawade rajendra gawaisaam tv
Published On

- अमर घटारे

Amravati News :

रिपब्लिकन ऐक्य आताही होऊ शकते, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) यांनी स्थापन केलेला मूळ पक्ष आमच्याकडे आहे. त्यामुळे रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी व्हावं तर रामदास आठवले (ramdas athawale) व जोगेंद्र कवाडे (jogendra kawade) यांना मी तयार करतो की त्यांनी त्या पक्षातील क्रमांक एक, क्रमांक दोनचे पदही देऊ. ते जर एकत्र आले नाही तर मी राजकारणातून सन्यास घेईन अशी भूमिका डाॅ. राजेंद्र गवई (rajendra gawai) यांनी अमरावती येथे मांडली. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे रिपाइं गवई गटाचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी कार्यकर्ता मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचे (lok sabha election) रणशिंग फुंकत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी (amravati loksabha constituency) रिपाइं गवई गटाचे नेते राजेंद्र गवई आग्रही असून मला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी नाही तर अमरावती महायुतीचा उमेदवार लोकसभेचा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर ठेवू तसेच माविआचा उमेदवार पाडू असा इशाराच त्यांनी दिला. गवई म्हणाले आम्ही दिल्लीला जाणार नाही, आम्हाला तिकीट द्यायची असेल तर आम्हाला घरीच (आमच्या मतदारसंघात) द्या.

ramdas athawale, prakash ambedkar, jogendra kawade rajendra gawai
Wardha NCP : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात गटबाजी, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिवांसह सहका-यांवर गुन्हा दाखल

दरम्यान राजेंद्र गवई यांनी आज अमरावती लोकसभा निवडणुकी बाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच टेंशन वाढले असणार हे निश्चित. आगामी काळात राजेंद्र गवई काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार.

Edited By : Siddharth Latkar

ramdas athawale, prakash ambedkar, jogendra kawade rajendra gawai
Parbhani : एसटीचे नियाेजन... भाविकांसाठी उरुसात धावणार 30 बस; जाणून घ्या तिकीट दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com