नागपूर : काल गडचिरोलीच्या जंगलात झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी ही कारवाई अचानक केली नाही, तर ही सुनियोजित कारवाई होती. मागील काही दिवसांपासून सुरजागड खाणीच्या विरोधात स्थानिक गावकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. यामध्ये काही नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना होती.
हे देखील पहा-
यातूनच पोलिसांनी २ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून या बैठकीची आणि यामध्ये मोठे नक्षल नेते सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, दोन्ही नक्षलवादी ज्युनिअर असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी पूर्ण विश्वास ठेवला नाही. दरम्यान २ दिवसांपूर्वी झारखंड मध्ये प्रशांत बोस या मोठ्या नक्षल नेत्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून या बैठकीची माहिती मिळाली आहे.
असे राबविले ऑपरेशन
पोलिसांनी नक्षलवाद्यांवर केलेले हे सर्जिकल स्ट्राईक होते. 'इनसर्कल अँड एलिमिनेट' म्हणजेच 'वेढा टाका वेढा आवळा आणि संपवत न्या' अशी रणनीती पोलिसांनी राबविली होती. त्यानुसार ४ तुकड्यांनी चारही बाजूनी नक्षलवाद्यांना घेरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या ऑपरेशनचं नेतृत्व एक महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. अतिशय सुनियोजित पद्धतीने राबविलेल्या या ऑपरेशनमुळे पोलिसांना नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. नक्षल विरोधात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणता येणार आहे. मोठ्या नक्षल नेत्यांना ठार केल्यामुळे नक्षल चळवळीचा कणा मोडला गेला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.