मोठी बातमी! माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; कोणतं साहित्य पोलिसांच्या हाती लागलं?

gadchiroli news : पोलिसांनी माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी पुरून ठेवलेले साहित्य नष्ट केले.
gadchiroli
gadchiroli newsSaam tv
Published On
Summary

गडचिरोलीत माओवादविरोधी मोठी कारवाई

पोलिसांकडून शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

माओवादी साहित्य हस्तगत

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. माओवाद्यांनी जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष शोध राबविण्यात आले. या शोध अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

gadchiroli
Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

माओवाद्यांकडून सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे आणि स्फोटक साहित्य जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. विशेषतः नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील काळात या साहित्याचा वापर करण्याचा कट असल्याचे तपासात उघड झाले आहे.

“ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत 16 मे 2026 रोजी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या चौकशीतून पोमकें-बिनागुंडा परिसरातील जंगलात शस्त्रनिर्मिती साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर 21 मे रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता पथक आणि बीडीडीएसच्या जवानांनी संयुक्त शोधमोहीम राबवली.

gadchiroli
Maharashtra News Live Update: खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करा, नागरिकांनी रोखला जुना मुंबई-पुणे- नागपूर महामार्ग

22 मे रोजी पोमकें-बिनागुंडाच्या उत्तरेकडील जंगल परिसरात कसून तपासणी केली असता, एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल आणि 20 फुटांचे फुटबॉल पाईप आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com