- मंगेश भांडेकर
Gadchiroli Crime News : नक्षलवाद्यांकडील 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी जाताना दोन युवकांना गडचिरोली पोलिसांनी (gadchiroli police) अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल 27 लाख 62 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत (Maharashtra News)
केंद्र शासनाने 30 सप्टेंबर नंतर 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद केले आहेत. त्यामुळे या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. अशातच नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडे असलेल्या नोटा विविध माध्यमातून बदलून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास विशेष अभियान पथकाचे जवान अहेरी येथे नाकाबंदी केली हाेती. दोन युवक दुचाकीवरून येतात संशयितरित्या आढळून आले. त्यांची चौकशी केली असता 2 हजार रुपयांच्या 607 नोटा, 500 च्या 372 नोटा, 200 रुपयांच्या 7 नोटा आणि शंभर रुपयाचे 106 नोटा अशी एकूण 27 लाख 62 हजार रुपयाची रक्कम आढळून आली.
या रकमे संदर्भात अधिक चौकशी केली असता दोघांनीही समर्पक उत्तर दिली नाही. मात्र पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच दोघांनीही ही रक्कम नक्षलवाद्यांची असल्याचे सांगून 2000 च्या नोटा बदलवण्यासाठी दिल्याचे सांगितले.
त्यानंतर पाेलिसांनी रोहित मंगू कोरसा (Rohit Mangu Korsa) (राहणार. एटापल्ली) आणि विल्लब गिरीश सिकदर (Biplav Gitish Sikdar) (राहणार. पानावर जि. कांकेर) यांना अटक केली. दोघांवरही युएपीए एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे आर्थिक स्त्राेत जटील झाल्याची चर्चा आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.