Chhatrapati Sambhaji Nagar News : औषध विक्रेत्याने उचललं टाेकाचं पाऊल, चिठ्ठीतील मजूकर वाचताच कुटुंबीय गहिवरले

व्यावसायिक बेपत्ता झाल्याची तक्रार पाेलिसांत देण्यात आली हाेती.
chhatrapati sambhaji nagar,
chhatrapati sambhaji nagar, saam tv
Published On

- नवनीत तापडिया

chhatrapati sambhaji nagar news: दिवसभर मित्र, ग्राहकांशी मनमोकळेपणाने बोलून रात्री उत्तम क्षमा, सबको क्षमा, ओम 'शांती' अशी चिठ्ठी दुकानात ठेवून मेडिकल व्यावसायिक अनिल ताराचंद अजमेरा (anil ajmera) यांनी आत्महत्या केली. अजमेरा यांच्या निधनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औषध विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये शाेककळा पसरली. (Maharashtra News)

chhatrapati sambhaji nagar,
Buldhana News : तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याचं माेठं धाडस, गुन्हा दाखल

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी - अजमेरा यांनी सोमवारी रात्री त्यांचे मेडिकल बंद केले. त्यानंतर ते रिक्षाने हर्सूल तलावाकडे गेले. तेथे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान ते बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पाेलिसांत दिली हाेती.

chhatrapati sambhaji nagar,
Lohagad Fort Encroachment News: लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटवा, ग्रामस्थांचा लाेहगावात माेर्चा

पाेलिस त्यांचा शाेध घेत हाेते. हा शोध घेत असताना पाेलिसांना हर्सूल तलावात नजीकहून एक माहिती मिळाली. पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केले असता त्यांना तलावानजीक एक चप्पल आढळली. अधिक शाेध घेतला असता ही चप्पल अजमेरा यांच्या असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.

chhatrapati sambhaji nagar,
Vasai News: भोईदापाडात पाेलिसांची जिगरबाज कामगिरी, पेटत्या कारमधून तिघांना काढलं बाहेर

त्यानंतर अजमेरा यांचा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहेे. अजमेरा हे शहरातील राजाबाजारमध्ये गेल्या 30 वर्षांपासून मेडिकलचा व्यवसाय करीत होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com