Buldhana News : तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याचं माेठं धाडस, गुन्हा दाखल

या घटनेमुळे तहसिल कार्यालय परिसरात माेठा गाेंधळ उडाला.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam TV
Published On

Buldhana News : वर्षभरापासून शेत रस्त्यासाठी तहसील कोर्टाच्या चकरा मारणाऱ्या शेतकऱ्याने शेगाव येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

Buldhana Crime News
Satara News: व्हय रं भा.... आमच्या संसाराची राख करताेयस व्हय, विक्रेत्याला चाेप, महिलांकडून दारु अड्डा उध्वस्त

अशोक सुपदाजी सुलतान (वय ५०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नायब तहसीलदार पवार हे पोलीस ठाण्यात पोहचले होते.

Buldhana Crime News
Shambhuraj Desai : अजित पवार तुमच्यासाेबत आलेत? शंभूराज देसाई म्हणाले, पाेपटाची चिठ्ठी... (पाहा व्हिडिओ)

शेगाव तालुक्यातील जलंब येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक सुपडाजी सुलताने यांच्या शेतात जाण्यासाठी आणि शेती करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. यामुळे शेजारील शेतकऱ्यांसोबत नेहमी वादविवाद आणि वाद तंटे होत होते. या संदर्भात सदर शेतकऱ्याने न्यायालयात दिवाणी आणि तहसील कार्यालयात रस्त्यासाठी प्रकरण रस्ता मिळण्यासाठी दाखल केले.

मात्र शेतकरी सुलताने यांच्या आरोपानुसार शेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पवार यांनी आपल्याला दिवाणी न्यायालयातून केस मागे घेण्यासाठी बाध्य करीत तुम्हाला तात्काळ शेत रस्ता उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले. (buldhana news)

Buldhana Crime News
Pune News : वाहनधारकांनाे ! चार जूलैपासून 'या' वेळेत चांदणी चौकातील वाहतुक मार्गात बदल; जाणून घ्या कारण

त्यानुसार सदर शेतकऱ्याने प्रकरण मागे घेतले. मात्र सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी शेत रस्ता उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे मागील हंगामात सोयाबीनचे पीक घरी आणता आले नाही. दुसरीकडे माझं तहसील कार्यालयातील प्रकरण खारीज करून टाकले. याबाबत आपण उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्याकडे दाद मागितल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतात भेट देऊन आपल्याला तीन महिन्याच्या आत तहसील कार्यालयाने रस्ता उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

Buldhana Crime News
Parbhani Crime News: पहिलीच्या प्रवेशासाठी लाच घेतली, एसीबीची लिपिकासह मुख्याध्यापकावर कारवाई

या आदेशालाही केराची टोपली दाखवीत आपल्याला नायब तहसीलदार पवार यांनी रस्ता देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी केली. आपण कर्जबाजारी असल्याने आपण ते पूर्ण केले नाही म्हणून आता शेत पेरणीचे दिवस आलेले असताना सुद्धा रस्ता उपलब्ध करून दिल्या नसल्याने त्रस्त होऊन शेगाव तहसील कार्यालयात आपल्या लहानग्या चिमुकल्या मुलासोबत तारखेवर हजर झालेल्या शेतकऱ्याने नायब तहसीलदार पवार यांच्या समक्ष आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Buldhana Crime News
After Ajit Pawar Rebel's: 'मला शरद पवार यांची मनापासून माफी मागायची आहे'; अजित पवारांना साथ देणारा आमदार भावुक

या घटनेने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने सदर शेतकऱ्याला शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी सदर शेतकऱ्यावर (farmers) उपचार सुरू आहेत. दुसरीकडे नायब तहसीलदार पवार हे शेतकऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com