
फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
फळपीकविमा योजनेत मिळते आर्थिक मदत
इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत
केंद्राने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे प्रंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, आता फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.
फळपीक विमा योजनेसाठी अर्जाची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ ऑक्टोबरपूर्वी अर्ज करायचे आहे.
शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा, केळी, मोसंबी, पपई, संत्री आणि डाळिंब या पिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. फळपिकांसाठी विमा मिळणार आहे. त्यामुळे यासाठी आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर करावेत. फळपिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे १५ दिवस उरले आहेत.
फळपिक विमा योजनेसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला पंतप्रधान फसल विमा योजना पोर्टलवर (https://www.pmfby.gov.in) अर्ज करता येणार आहेत. केळी, मोसंबी व पपईसाठी अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर, तर इतर पिकांसाठी पुढील मुदती निश्चित करण्यात आल्या आहेत.ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज करावेत.
फळपीक योजना आहे तरी काय?
फळपीक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळ पीकासाठी संरक्षण दिले जाते. हवामानातील बदलांमुळे फळबागांचे होणारे नुकसान यापासून आर्थिक संरक्षण दिले जाते. केंद्राच्या पंतप्रधान फसल योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यावर तुम्हाला भरपाई मिळणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे ही योजना राबवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.