Car Insurance: कार विमा घेताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कार विकत घेणे

गाडी खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण ही जबाबदारी देखील असते. दैनंदिन प्रवासादरम्यान कधीही अपघात होऊ शकतो. म्हणून खर्च टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी विमा खूप उपयुक्त आहे.

car | yandex

कार इंश्योरेंस पॉलिसी

बाजारात अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी उपलब्ध आहेत. पण त्या सर्वांसाठी सारख्या नसतात. म्हणून, कार विमा घेताना, तुम्ही विशेषतः काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण चुकीची पॉलिसी निवडल्याने जास्त नुकसान आणि कमी फायदे होऊ शकतात.

car | yandex

थर्ड पॉलिसी

तुम्ही तुमचा दैनंदिन वापर आणि तुमचे बजेटनुसार विमा पॉलिसी खरेदी करा. पॉलिसी खरेदी करताना, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे जाणून घ्या. देशात फक्त थर्ड पार्टी पॉलिसी अनिवार्य आहे.

Car | yandex

कॉम्प्रिहेसिंव्ह पॉलिसी

कॉम्प्रिहेसिंव्ह पॉलिसी ही उत्तम पॉलिसी मानली जाते. या पॉलिसोबत जीरो डेप्रिसिएशन, रोडसाइड असिस्टंट आणि इंजिन प्रोटेक्शन सारखे अॅड ऑनकडे दुर्लक्ष करु नका.

Car | Saam TV

योग्य अॅड ऑन निवडा

तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींनुसार योग्य अॅड-ऑन निवडा. कार विमा काढणे सोपे आहे. पण क्लेम करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर कंपनीची क्लेम प्रक्रिया लांब किंवा कठीण असेल तर समस्या निर्माण होईल.

Car | yandex

नो क्लेम बोनस

नेहमी अशी कंपनी निवडा जिचा क्लेम लवकर होईल. पॉलिसी खरेदी करताना, फक्त कमी प्रीमियम न पाहता योग्य कव्हर मिळत आहे का ते पहा. नो क्लेम बोनसकडे देखील लक्ष द्या.

Car | yandex

पॉलिसी रिन्यू

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची पॉलिसी वेळेवर रिन्यू का. जर एकही दिवस चुकला तर पॉलिसी रद्द होऊ शकते आणि तुम्हाला संपूर्ण तपासणी पुन्हा करावी लागू शकते. हा त्रास टाळण्यासाठी, तारीख लक्षात ठेवून रिन्यू करत रहा.

Car | Saam TV

NEXT: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

jeans | yandex
येथे क्लिक करा