AkkalkuwaVidhan Sabha: अक्कलकुवामध्ये चौरंगी लढत; कोण जिंकणार?

Nandurbar : राज्यातील क्रमांक एकचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळतेय.
Akkalkuwa News
AkkalkuwaSaam Tv
Published On

राज्यातील क्रमांक एकचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळतेय. गेल्या ३५ वर्षांपासून के. सी. पाडवी इथले आमदार आहेत. यावेळी मात्र राजकीय समिकरण बदलली आहेत. भाजपला रामराम करत अपक्ष लढणाऱ्या हिना गावीत यांच्यामुळे चुरस वाढली आहे.

अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ काँग्रेसचा(Congress) गड मानला जातो. गेल्या ३५ वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेसचे के. सी. पाडवी हे निवडून येत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता विजय मिळवला असला तरी या मतदारसंघात त्यांचा दबदबा कायम आहे. यंदाही तेच रिंगणात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना(Shiv Sena) शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना महायुतीनं उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये आमश्या पाडवी यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा पराभवाचा वचपा ते काढणार का? याकडे लक्ष आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी दोन टर्म खासदार असलेल्या डॉ हिना गावित यांचा पराभव केला होता. त्यामुळे वचपा काढण्यासाठी हिना गावित यांनी महायुतीत बंडखोरी केली आणि रिंगणात उतरल्या. तर भारत आदिवासी पार्टीतर्फे वळवी रिंगणात उतरलेत. वळवी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदारसंघ आदिवासींसाठी आरक्षित आहेत.अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातील जातीय समीकरण पाहूया. अक्कलकुवाचं जातीय समीकरण आदिवासी - 80 टक्के आणि इतर मागासवर्गीय -10 टक्के, खुला प्रवर्ग -6 टक्के, अनुसूचित जाती -2 टक्के शिवाय अल्पसंख्यांक -2 टक्के इतके आहे. अक्कलकुवामध्ये तीन दशकापासून काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी निवडून येत असले तरी रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधा नसल्याची ओरड होतेय. रोजगाराचा मुद्दाही आहेच. त्यामुळे चौरंगी लढतीत मतदारराजा कोणाच्या पारड्यात मत टाकतोय ? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

Akkalkuwa News
Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com