Aurangabad-Pune Highway Accident: विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात, चार जण गंभीर जखमी

ग्रामस्थांनी पाेलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेले.
students, trip, aurangabad pune highway
students, trip, aurangabad pune highwaysaam tv

- नवनीत तापडिया

Aurangabad Accident News : नगरहून जालन्याच्या दिशेने निघालेल्या एका बसचा आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास दहेगाव बंगला येथे अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील जखमी हे जालना (jalna) येथील रहिवासी असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

students, trip, aurangabad pune highway
Teacher Molested : शिक्षकाकडून शिक्षिकेचे शाेषण, तक्रारीनंतर गंभीर गाेष्टी समाेर; गुन्हा दाखल

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार औरंगाबाद पुणे महामार्गावर (aurangabad pune highway) ईसारवाडीफाटा येथे दहेगाव बंगला नजीक विद्यार्थ्यांच्या सहलीच्या मिनी ट्रॅव्हल्सचा झाडाला धडकून अपघात झाला. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (accident) झाला.

students, trip, aurangabad pune highway
Saam Impact: सरकारला घ्यावी लागली साम टीव्हीच्या 'त्या' बातमीची दखल, शेतकऱ्याला मिळाला न्याय

या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील जालना येथील कुटुंबातील दोन मुलांसह एक महिला गंभीर जखमी (injured) झाली. या अपघातानंतर स्थानिकांनी सर्व जखमींना पोलिसांच्या मदतीने गंगापूर येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com