सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडीक असलेल्या इमारतीमध्ये एका बहात्तर वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे संबंधित महिलेनं आत्महत्या केली की हा घातपात आहे याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.
हे देखील पाहा -
या महिलेची ओळख पटली असून ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या मुलींनी ओळख पटताच हंबरडा फोडला. मयत महिला ही जुना विडी घरकुल परिसरात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पाहिले असता महिलेचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पंचनामा करून सर्व मिळालेले साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सदर महिलेची हत्या झाली की आत्महत्या हा प्रश्न सोलापुरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.