आर्थिक विवंचनेतून धारणीत शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

मेळघाट हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो येथील बहुतांश आदिवासींचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
Amravati News
Amravati NewsSaam Tv

अमर घटारे

अमरावती - मेळघाट हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो येथील बहुतांश आदिवासींचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्यानं (Farmer) आत्महत्या केल्याची एक हृदय हेलवणाऱ्या घटना मेळघाटमध्ये घडल्या आहेत. याच आदिवासी बहुल भागात धारणी येथे राहणाऱ्या नंदू कासदेकर या शेतकऱ्याने रविवारी रात्री शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे. नंदू कसदेकर यांच्याकडे ४ एककर शेती आहे. आधीचा शेतीवर कर्जाचा डोंगर आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील पेरनीचा हंगाम सुरू झाला आहे.

हे देखील पाहा -

त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. अखेर संसाराचा गाडा ओढून शेती कशी करायची या विवंचनेतून नदू यांनी कायमच स्वतः ला संपविल आहे. सद्या नंदूचा मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. शतकऱ्याच्या या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. कासदेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com