Ahmednagar Tiger News : वो बिबट्या है, चपात्या नही खाता; प्रकरण पोहोचलं पोलिस ठाण्यात, नेमकं काय घडलं?

Forrest बिबट्याला चक्क चपात्या खाऊ घातल्या जात असल्याचे समोर आलं आहे.
Ahmednagar Leopard News
Ahmednagar Leopard News Saam TV
Published On: 

सचिन बनसोडे

Ahmednagar News : 'वो टायगर है भाकरी खाता है भाकरी...', आमीर खानची ही जाहिरात तुम्हाला आठवतच असेल. मात्र जाहिरातीत रागावलेला आमीर पर्यटकांना चुकीची माहिती देताना दाखवण्यात आला आहे. मात्र अहमदनगरमध्ये असाच प्रकार समोर आला आहे, जिथे बिबट्याला चक्क चपात्या खायला दिल्या जात आहे.

अहमदनगरमध्ये एका बिबट्याला वनविभागाने पकडलं आहे. मात्र या बिबट्याची सध्या उपासमार सुरू आहे. बिबट्याला चक्क चपात्या खाऊ घातल्या जात असल्याचे समोर आलं आहे.

Ahmednagar Leopard News
Darshana Pawar CCTV Footage : तोंडावर स्कार्फ, पाठीवर बॅग... दर्शना पवार-राहुल हांडोरेच्या शेवटच्या भेटीचा VIDEO समोर

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात वनविभागाच्या कार्यालय परीसरात आणलेल्या बिबट्याची उपासमार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत वन कर्मचाऱ्यावंर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. (Latest News)

Ahmednagar Leopard News
Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा हायवेबद्दल मोठी अपडेट, गणपतीआधी कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार?

वन विभागाने पकडलेल्या बिबट्यांना मांस खाऊ घालण्याची तरतूदही केलेली असते. मात्र लोणी येथे वनविभागाच्या कार्यालयात आणलेल्या बिबट्याकडे वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.