तूच सर्वात बेस्ट सून, शरद पवारांच्या जुन्या सहकाऱ्याकडून सुनेत्रा पवारांचं कौतुक; आग्रहाने जेवायलाही लावलं

Baramati Lok Sabha 2024: तूच सर्वात बेस्ट सून, असं म्हणत माजी खासदार नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच त्यांना आग्रहाने जेवायलाही घातलं.
Baramati Lok Sabha 2024
Baramati Lok Sabha 2024Saam TV

Nanasaheb Navale Praises Sunetra Pawar

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. रविवारी (ता. २१) सुनेत्रा पवार मुळशी तालुक्यात प्रचाराला आल्या होत्या. यावेळी त्यांनी माजी खासदार नानासाहेब नवले यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. नवले यांनी सुनेत्रा पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच त्यांना आग्रहाने जेवायलाही घातलं.

Baramati Lok Sabha 2024
Sharad Pawar: शरद पवारांचा मास्टर प्लान, माढ्यात ६ जंगी सभा घेणार; भाजपचं टेन्शन वाढणार!

सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच नानासाहेब नवले म्हणाले 'यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ'. दरम्यान, नानासाहेब नवले यांच्या या म्हणण्याला नेमकी पार्श्वभूमी कोणती? हे ओळखून उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी मात्र, नवले यांना नमस्कार करून त्यांच्या कौतुकाचा विनम्रपणे स्वीकार केला.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांनी मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काहींनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली.

अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांनी माझा तसा बोलण्याचा उद्देश नव्हता. अर्थाचा गैरअर्थ काढला जात आहे, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

आता शरद पवार यांचेच एकेकाळचे सहकारी असलेले नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवार यांना, "तू सर्वात बेस्ट सून आहेस, असं म्हणत त्यांची प्रशंसा केली आहे. इतकंच नाही, तर नवलेंनी आग्रह करुन सुनेत्रा पवार यांना जेवणही करायला लावलंय. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Baramati Lok Sabha 2024
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून प्रचाराचा धडाका, आज अमरावती, वर्ध्यात जंगी सभा घेणार; 'मविआ'ची ताकद वाढणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com