Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून प्रचाराचा धडाका, आज अमरावती, वर्ध्यात जंगी सभा घेणार; 'मविआ'ची ताकद वाढणार!

Maharashtra Lok Sabha Election: उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून ते आज अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV

Uddhav Thackeray Amravati and Wardha Sabha

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुती आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विदर्भात जंगी सभा घेतल्या होत्या. आता उद्धव ठाकरे देखील विदर्भ दौऱ्यावर असून ते आज अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत.

Uddhav Thackeray
Buldhana News: उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी; VIDEO तुफान व्हायरल

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बळवंत वानखेडे यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. नवनीत राणा यांना शह देण्यासाठी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) अमरावती दौरा करणार आहे. दुपारी १२ वाजता दोन्ही नेते जाहीर सभा घेणार आहे.

नवनीत राणा यांच्या बालेकिल्ल्यात प्रथमच उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत ते नेमकं काय बोलणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, अमरावतीतील सभेनंतर सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट येथे सभा होणार आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रामदास तडस यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असल्याने या सभांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल.

उद्धव ठाकरेंची सभेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ बुलढाण्यातील खामगाव येथे रविवारी (ता. २१) जंगी सभा घेतली. मात्र, ही सभा संपताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात चांगलाच राडा झाला. या घटनेनं काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

Uddhav Thackeray
Raigad Accident : मोठी बातमी! ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात अनर्थ टळला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com