Ashish Deshmukh News: मोठी बातमी! माजी आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार

Ashish Deshmukh News: काँग्रेसने निलंबित केलेले माजी आमदार डॉ. आशीष देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे .
Ashish Deshmukh
Ashish DeshmukhSaamtv
Published On

Nagpur News: काँग्रेसने निलंबित केलेले माजी आमदार डॉ. आशिष देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. देशमुख हे रविवारी नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. (Latest Marathi News)

माजी आमदार आशिष देशमुख यांच्याकडून सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित केले होते. काँग्रेसने पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली होती. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर आशिष देशमुख कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते.

Ashish Deshmukh
Brij Bhushan Sharan Singh On Congress: महिला कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले - 'मी काँग्रेसच्या षडयंत्राचा बळी'

काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर आशिष देशमुख भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. त्यानंतर आता आशिष देशमुख भाजपात प्रवेश करणार,यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आशिष देशमुख रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख हे नागपूरच्या नैवेद्यम नार्थस्टार, कोराडी येथे प्रवेश करणार आहे. आशिष देशमुख यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

Ashish Deshmukh News
Ashish Deshmukh NewsSaam tv

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आशीष देशमुख आगामी विधानसभा निवडणुकीत काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Ashish Deshmukh
Sharad Pawar Threat Case: शरद पवार धमकी प्रकरण, आरोपी सागर बर्वेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून काटोलमधून निवडून आले होते. देशमुख यांनी त्यांचे काका तसेच माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. त्यानंतर आशिष देशमुख यांचा पक्षात अंतर्गत वाद झाला.

या वादामुळे त्यांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आशिष देशमुख यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com