Delhi News: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी कुस्तीपटूंनी गेल्या महिन्यापासून आंदोलन (Wrestler Protest) करत आहे. जोपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. अशामध्ये त्यांनी कुस्तीपटूंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षावरच गंभीर आरोप केला आहे.
महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ब्रिजभूषण यांनी सांगितले की, 'मी काँग्रेस पक्षाच्या षडयंत्राचा बळी आहे.' दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरप्रकरणी येत्या दोन-तीन दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल. एका अल्पवयीन कुस्तीपटू मुलीसह एकूण 6 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर काही आरोपींविरुद्ध नवी दिल्ली अंतर्गत कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एसआयटी पथकाची स्थापना केली होती.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांचे पथक तपास करत आहे. या प्रकरणी तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंडसह अनेक राज्यांना भेटी दिल्या. त्यांनी आतापर्यंत डझनभर लोकांचे जबाब नोंदवले आहेत.
पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या घरी जाऊन देखील त्यांच्या घरात काम करणाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. पुरावे गोळा करताना दिल्ली पोलिसांसमोरही अनेक आव्हाने आहेत. कारण हे प्रकरण अनेक वर्षे जुने आहे. वर्षानुवर्षे जुने प्रकरण असल्याने व्हिडिओ फुटेज आणि ते पुरावे गोळा करणे आणि आरोप सिद्ध करणे हे मोठे आव्हान ठरत आहे.;]
अशामध्ये ब्रिजभूषण यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पैलवानांनी पुरावे म्हणून दिल्ली पोलिसांना ऑडिओ-व्हिडिओ हे पुरावे म्हणून दिले आहे. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप करणाऱ्या 6 महिला पैलवानांपैकी चौघांनी पोलिसांना या प्रकरणातील पुरावे दिले आहेत. या महिला पैलवानांनी ब्रिजभूषण यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलीस 15 जून रोजी म्हणजे उद्या पहिली चार्जशीट सादर करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.