Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv

Ajit Pawar News: डोंबिवलीतील पोलीस अधिकाऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता; अजित पवारांचा गंभीर आरोप

Ajit Pawar News: अजित पवार यांनी बागडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला आहे.
Published on

Ajit Pawar News: डोंबिवलीतील भाजप पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे चर्चेत आले आहेत. वरिष्ठ निरीक्षक बागडे यांनी गुन्हा दाखल करण्यात पुढाकार घेतल्याच्या आरोपानंतर भाजप विरुद्ध बागडे असा वाद सुरू झाला आहे. अशातच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी बागडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेशी संवाद साधला. अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

अजित पवार म्हणाले, 'मी माहिती अधिकारात माहिती मागितली. ठाणे जिल्ह्यात १०० लोकांना संरक्षण देण्यात आले आहे. या १०० लोकांना संरक्षण दिल्याने त्यांचा खर्च शासनावर पडतो. काही नाव अशी आहेत, त्यांचे व्यवसाय इतर आहेत. त्यांना सरकारी खर्चातून संरक्षण देण्याची गरज नाही. माझ्या हातात यादी आहे. यात लोकप्रतिनिधी आहेत. १०० यादीत निम्यावर अशी लोक ज्यांना संरक्षण द्यायची गरज नाही. फक्त दाखवण्यासाठी सुरू आहे'.

Ajit Pawar News
Political News : अकोला धाड प्रकरण कृषिमंत्र्यांना भोवणार? मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तार एकाकी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही नाराज

शेखर बागडे यांच्यावर आरोप करताना अजित पवार म्हणाले, 'पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची संपत्ती खूप आहे. त्याबाबत तक्रार आली आहे. मी पण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे'. दरम्यान, भाजप नेत्यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यावर आक्षेप घेतला, त्यांची बदली करायची मागणी केली. त्याच पोलीस अधिकाऱ्याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

'पोलीस अधिकाऱ्याकडे इतकी मोठी संपत्ती कशी असू असते. बेहिशोबी मालमत्ता आहे. माझ्याकडे माहिती आहे. शेखर बागडे यांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केली. माझी गृहमंत्री यांना मागणी आहे की, हे प्रकरण एसीबीकडे द्यावे, बागडे यांची वस्तुस्थिती समोर आली पाहिजे, असे अजित पवार पुढे म्हणाले.

Ajit Pawar News
Brij Bhushan Sharan Singh Case: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढल्या; 4 महिला पैलवानांनी दिले पोलिसांना पुरावे, आता पुढे काय?

'बागडे यांनी संपत्ती कशी कमावली? त्यांच्यासंबंधित वादात मला पडायचं नाही. तो भाजपचा स्थानिक प्रश्न आहे. शिवसेना आणि भाजप वादात मला पडायचे नाही. हा पोलीस मस्तवापणे वागतो, माझ्याकडे तक्रार आली होती, मी बोलवून घेतले होते. ठाण्यात राहून मग्रूरपणा करत असेल तर कोणाचा वरदहस्त असेल, त्याशिवाय कसा काय बेफाम वागत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com