New Delhi: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या दिवसेंदिवस अडचणी वाढू लागल्या आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. या तपासासाठी पैलवानांनी पुरावे म्हणून दिल्ली पोलिसांना ऑडिओ-व्हिडिओ हे पुरावे म्हणून दिले आहे . पोलीस या प्रकरणाची १५ जून रोजी पहिली चार्जशीट सादर करणार आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या ६ महिला पैलवानांपैकी चौघांनी पोलिसांना या प्रकरणातील पुरावे दिले आहेत. या महिला पैलवानांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.
या आरोपानंतर पोलिसांनी महिला पैलवानांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर या गेल्या रविवारी या महिला पैलवानांनी पोलिसांकडे ऑडिओ-व्हिडिओ स्वरुपात पुरावे सादर केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २०० जणांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये तक्रारकर्त्या महिला पैलवान, प्रशिक्षक, रेफरी आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या सहकाऱ्याचा सामावेश आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणात तपासासाठी ५ देशांच्या कुस्ती महासंघाची मदत मागितली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणात या महासंघाला पत्र लिहून काही व्हिडिओ आणि फोटो मागितले आहेत.
५ देशांच्या कुस्ती महासंघाला लिहिलं पत्र
महिला पैलवानांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर इंडोनेशिया, बुल्गारिया, कझाकिस्तान, मंगोलिया आणि किर्गिस्तानमध्ये आयोजित स्पर्धेदरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी या देशातील कुस्ती महासंघांना स्पर्धेचे व्हिडिओ आणि स्पर्धक थांबलेल्या ठिकाणाचे व्हिडिओ मागितले आहेत.
दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, या देशांकडून मागविण्यात आलेले व्हिडिओ स्वरुपातील पुरावे १५ जूनपर्यंत मिळणे मुश्किल आहे. तर दुसरीकडे १५ जूनपर्यंत दिल्ली पोलीस या प्रकरणाचा अहवाल सादर करणार आहे. यामुळे दिल्ली पोलीस १५ जूननंतर या पुराव्याचं पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.