Political News : अकोला धाड प्रकरण कृषिमंत्र्यांना भोवणार? मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तार एकाकी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही नाराज

Abdul Sattar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
Abdul Sattar
Abdul SattarSaam Tv
Published On

Mumbai News : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अकोल्यात कृषी विभागाच्या कथित पथकाच्या धाडींनंतर अब्दुल सत्तार एकाकी पडल्याचं चित्र आहे.

राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण देखील ऐकून घेतलं नसल्याची माहिती आहे. बोगस बियाणे आणि खत विक्रेत्यांवर कृषी विभागाकडून छापेमारी करताना खासगी व्यक्तीची मदत घेतल्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप आहे.

खासगी व्यक्ती छापे कसे टाकू शकतात, अशी विचारणाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहेत. (Latest Marathi News)

Abdul Sattar
Political News : शिवसेनेच्या जाहिरातीचे साईड इफेक्ट्स; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे जाहीर कार्यक्रम आजही टाळले?

काय आहे प्रकरण?

अकोल्यातील एमआयडीसीमध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकामध्ये कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळींचा देखील समावेश असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर सरकारी पथकाच्या धाडीत खासगी व्यक्तीचा समावेश कसा होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित होत होता. (Maharashtra Political News)

Abdul Sattar
Jalgaon NCP News: कापूस प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; जळगावात पुकारने बेमुदत उपोषण

अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं की, दिपक गवळी माझा पीए नाही तर तो कृषी अधिकारी आहे. कृषी विभागाच्या पथकात खासगी व्यक्ती नाहीत. ४२ अधिकारी पथकात होते. दीपक गवळीचा काही दौऱ्यामध्ये माझा पीए असल्याचा उल्लेख झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com