(भूषण अहिरे, धुळे)
मराठा समाजाला नेहमीप्रमाणे फसवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्हाला परमेश्वर देखील वाचवू शकत नाही, असे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे विश्वासार्ह असे व्यक्तिमत्व टीका देखील गोटे यांनी केलीय. ते पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.(Latest News)
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले आहे. राज्य सरकारला दिलेला वेळ पूर्ण होत आला असून जरांगे पाटलांनी परत एल्गार पुकारलाय. आपल्या पहिल्या जनसभेत बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं. आता माजी आमदार अनिल गोटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. देवेंद्र फडणवीस हे खोटारडे असल्याची टीका देखील गोटे यांनी केली.
मराठा समाज इतक्या ताकदीने पहिल्यांदाच उभा राहिला आहे. जरांगे पाटलांना मराठा समाजाने मराठा आरक्षणासंदर्भात जो पाठिंबा दिला आहे. त्यादरम्यान मराठा समाजाला फसवण्याची चुकी देवेंद्र फडणवीस यांनी करू नये असा सल्ला देखील गोटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे ५ वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगरांना देखील अशाच प्रकारे त्यांनी फसवले होते, असा आरोप गोटे यांनी केला आहे.
दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची अंतरवली सराटी गावात विराट सभा झाली. ही सभा तब्बल १०० एकरच्या मैदानात पार पडली. या सभेत जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. सदावर्ते कुणाचे पिल्लू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या मालकांनी आता हे सांगितलं आहे का? १०६ आमदार तुम्हाला यासाठी निवडून दिले होते का?" असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.