Nashik News: स्मार्ट मीटर लावा नाहीतर वीजपुरवठा खंडीत करू, वीज वितरण कर्मचारांची ओवरस्मार्टगीरी

Smart Meter: राज्य सरकारने स्मार्ट मीटर संकल्पना लागू केली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांची संमती घेतली जावी. तरीही, वीज वितरण कर्मचारी या आदेशाकडे दुर्लक्ष करून मनमानीपणे स्मार्ट मीटर बसवत आहेत.
nashik smart meter news
nashik smart meter news Saam Tv
Published On

नाशिक शहरात काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबरदस्ती सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. तुमचे मीटर बदलून घ्या आणि नवीन मीटर लगेचच बसवून घ्या नाहीतर, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तुमची वीज खंडित करतील आणि नंतर स्मार्ट मीटर बसविण्यासाठी तुम्हाला साडे बारा हजार रुपये द्यावे लागतील अशी बंडल मारत आहे.यामुळे नाशिककर हे संभ्रम अवस्थेत आहेत.

nashik smart meter news
Palghar : चोरीचा मोबाईल घेऊन पळाला अन् कोसळला ५० फूट खोल विहिरीत; चोरटा गंभीर जखमी

विशेष म्हणजे या स्मार्ट मीटरबाबत संबंधित वीज वितरण कंपनी अधिकारी वर्ग प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करीत आमच्यावर देखील मुंबई कार्यालायातून दबाव असल्याचे जाहीरपणे सांगत आहे. वीजमीटर बदलताना ग्राहकांना या प्रकारची कुठलीही माहिती न देता थेट स्मार्ट मीटर बसविण्याचे काम काही ठेकेदार आणि कर्मचारी करत आहेत. या स्मार्टमीटरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज मीटर बदलू नका अशा सूचना दिल्या आहे. तरी देखील स्मार्ट लावण्याची ओवरस्मार्टगीरी नाशिकमध्ये उघडपणे सुरू आहे.

nashik smart meter news
Nashik News: नाशिक कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटणार? गिरीश महाजनांनी घेतली रवींद्र पुरी महाराजांची भेट

ग्राहकांसोबत दादागिरीची भाषा

संबंधित ठेकेदार ग्राहकांना आम्ही स्मार्ट मीटर बसविणार,तुम्हाला जिथे तक्रार करायची असेल तिथे करा, आता जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले,तर आम्ही परत येणार नाही. तसेच स्मार्ट मीटर न लावल्यास वीज वितरण कंपनी कर्मचारी तुमचे मीटर काढून नेतील किंवा तुमची वीजजोडणी खंडित करतील, असे खोटे सांगून नाशिककरांची दिशाभूल करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com