Nashik News: नाशिक कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटणार? गिरीश महाजनांनी घेतली रवींद्र पुरी महाराजांची भेट

Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये 2027मध्ये महाकुंभ होणार आहे. सरकारी पातळीवर महाकुंभाची तयारी सुरू आहे. याचदरम्यान कुंभमेळ्याच्या नावावरून वाद सुरू झालाय.
Nashik News
Nashik Kumbh Melasaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नामकरणावरुन वाद सुरू आहे. कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वरचं नाव द्यायचं की नाशिकचं महाकुंभ नाव द्यायचं यावरुन महंतांमध्ये जुंपलीय. यापार्श्वभुमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी यांची भेट घेतली. गिरीश महाजन आणि रवींद्रपुरी महाराज यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.कुंभमेळाच्या नामकरणावरून दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगितल जातंय.

गिरीश महाजन आणि रवींद्र पुरी यांची भेट त्र्यंबकेश्वरच्या पंच दशनाम जुना आखाडामध्ये झाली. या बैठकीला आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज देखील उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या नामकरणावरून सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये वाद सुरू आहे. कुंभमेळ्याला नाशिकचे नाव देऊ देणार नाही, अशी भूमिका रवींद्र पुरी महाराजांनी घेतलीय. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

Nashik News
Tanaji Sawant: तानाजी सावंत यांची आमदारकी जाण्याची शक्यता; औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस

नाशिकमध्ये महाकुंभ 2027मध्ये होतोय. सरकारी पातळीवर महाकुंभाची तयारी सुरू आहे, मात्र त्याचदरम्यान कुंभमेळ्याच्या नामकरणावरुन वाद निर्माण झालाय. त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असं म्हणायचं की नाशिक-त्र्यंबकेश्वर म्हणायचं यावरुनही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये जुंपलीय. कुंभमेळ्याला नाशिकचे नाव देण्यास रवींद्र रपुरी महाराजांचाही विरोध आहे. महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री देशपांडे हे साधू महंत नसल्याचा आरोप महंत शंकरानंद सरस्वतींनी केलाय. नामकरणाचा वाद मिटवण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांची भेट घेतली असून दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

Nashik News
UddhavThackeray: उद्धव ठाकरे आधुनिक काळातील औरंगजेब; शिंदे गटातील नेत्याची घणाघाती टीका

या बैठकीला आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज देखील उपस्थित होते. याबैठकीत त्र्यंबकेश्वरमधील विकास कामांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर नामकरणाच्या वादावरही त्यांच्यात चर्चा झाली असावी, असा अंदाज लावला जात आहे.

शाहीस्नानाचा वाद

नामकरणासह शाहीस्नानावरून देखील वाद सुरू असल्याचं दिसत आहे. शाहीस्नानाचा अधिकार कुणाचा यावरुनही महंतांमध्ये तीव्र मतभेद आहेत. कुंभात पहिलं शाहीस्नान कोण करणार यावरुन वाद आहे. पेशव्यांच्या काळात त्र्यंबकेश्वरला शैव तर नाशिकच्या रामकुंडात वैष्णव शाही स्नान करतात, असा निवाडा झाला होता. पण प्रयागराजला राष्ट्रीय आखाडा बरखास्त झाल्यानं शाहीस्नानाचा वाद निर्माण झालाय.

त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी फायदा होणार : गिरीश महाजन

अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्षांची भेट घेण्याआधी गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरला 'अ' दर्जा मिळाल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. 'अ' दर्जा मिळाल्याने त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी फायदा होणार आहे. कुंभमेळासाठी मोठा निधी केंद्राकडून लवकर मिळणार आहे. कुंभमेळ्याचे सर्व काम पूर्ण होतील, असं आमच नियोजन आहे. अतिशय वेगाने काम सुरू आहेत, सर्व कामे पूर्ण होतील. त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर केलं जाणार असल्याची माहिती ही महाजन यांनी दिली.

त्र्यंबकेश्वरसाठी कॉरिडॉर करायचा असेल तर थोडफार अतिक्रमण काढावं लागेल. पण कुणाचं नुकसान करणार नाही, बधितांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल. देशभरातून भाविक येथे येतात, त्यामुळे हा कॉरिडॉर होणारच असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com