Thane : ५ वर्षीय मुलाचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ५ वर्षीय मुलाचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Thane Child
Thane Child Saam Tv
Published On

ठाणे : ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ५ वर्षीय मुलाचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ठाण्यातील (Thane) पाचपाखाडी परिसरातील ओपन हाउस टेकडी बंगला या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Thane Latest News In Marathi )

Thane Child
धक्कादायक! चौदाशे रुपयांसाठी मित्रांनीच केली मित्राची हत्या

मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्लोक म्हात्रे असे मृत मुलाचे नाव आहे. उद्या या चिमुकल्याचा शाळेचा पहिला दिवस आणि त्या आधीच त्याच्या सोबत ही दुर्दैवी घटना घडली.मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिक रहिवाश्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Thane Child
जन्मदाते निघाले वैरी! सात महिन्यांच्या मुलीला भिकारी महिलेजवळ सोडून केले पलायन

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या शाळेचा (School) पहिला दिवस म्हणून आई बाबांनी नवीन गणवेश, शाळेची बॅग, वह्या, पुस्तक, पाण्याची बाटली, बास्केट, पावसाळ्यासाठी शूज, छत्री, रेनकोट अशी सगळी तयारी केली. मात्र उद्याचा दिवस उजाडण्या आधीच काळाने घाला घातला. ही दुर्दैवी घटना घडली आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील ओपन हाउस टेकडी बंगला येथील गीता अपार्टमेंट इमारतीत. ५ वर्षीय चिमुकला श्लोक म्हात्रे हा गीता अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्यावर राहत होता. खेळता खेळता श्लोक ५ व्या मजल्यावर गेला आणि तोल जाऊन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी श्लोकला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडे ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. श्लोकच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब दु:खात बुडाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण पाचपाखाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com