जन्मदाते निघाले वैरी! सात महिन्यांच्या मुलीला भिकारी महिलेजवळ सोडून केले पलायन

नाशिकमध्ये सात महिन्याच्या मुलीला (Girl) जन्मदात्यांनी एका भिकारी महिलेजवळ सोडून पलायन केल्याचा प्रकार केला आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam Tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : मुलगी जन्माला आल्यावर काही घरात आनंदाने स्वागत केले जाते. मात्र नाशिकमध्ये सात महिन्याच्या मुलीला (Girl) जन्मदात्यांनी एका भिकारी महिलेजवळ सोडून पलायन केल्याचा प्रकार केला आहे. नाशिकच्या (Nashik) सीबीएस बस स्थानकात या मुलीला सोडून देण्यात आले आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या मुलीच्या पालकांचा शोध घेत आहे. ( Nashik Crime news In Marathi )

Nashik Crime News
बुलढाणा-अजिंठा महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे बस स्थानकात एका भिकारी महिलेच्या जवळ सात महिन्याची मुलगी एका भिकारी महिलेजवळ सोडून जन्मदात्यांनी पलायन केलं आहे. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. सदर प्रकारानंतर चाईल्ड लाईनने तातडीने पावले उचलली. त्यांनी थेट पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मुलीला चाईल्ड लाईनच्या मदतीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तातबतोब उपचार सुरू केले. आता सदर मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे. पोलीस या मुलीच्या पालकांचा शोध घेत आहे.

Nashik Crime News
Ajit Pawar | 'अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान'- सुप्रिया सुळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सीबीएस बस स्थानकात भिकारी महिलेजवळ सात महिन्यांची मुलगी असल्याची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. त्यानंतर चाईल्ड लाईनचे पथक तत्काळ सीबीएस बस स्थानकात दाखल झाले. सीबीएस बस स्थानकात पोहोचताच मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीला चाईल्ड लाईनच्या मदतीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. सध्या रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू आहेत. सदर सात महिन्याच्या मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे. पोलीस सदर मुलीच्या पालकांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com