Shirpur Jain Temple : जैन समुदाय मंदिर परिसरात एकमेकांशी भिडले, लाठ्या काठ्यांचा प्रसाद; तिघे जखमी

पाेलीसांचा मंदिर परिसरात बंदाेबस्त तैनात आहे.
washim news
washim newssaam tv
Published On

- मनाेज जयस्वाल

Washim News : जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिमच्या शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात पुन्हा एकदा दोन्ही पंथीयांमध्ये आज (गुरुवार) सकाळी वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर दाेन गटात मारामारी देखील झाली. (Maharashtra News)

washim news
Childrens Passed Away : निरागस मुलांनी संपवली जीवन यात्रा, पाेलीस कुटुंबियांसह शेतमजूरांना धक्का

शिरपूरच्या भगवान पार्श्वनाथ मंदिरात मारामारी झाल्याची पाेलीसांपर्यंत पाेहचली. या घटनेची माहिती मिळताच शिरपुर पोलीसांनी मंदिराकडे धाव घेतली. पाेलीस घटनास्थळी पाेहचेपर्यंत वाद शमला हाेता परंतु त्याची धग धगत हाेती.

washim news
Trains Cancelled : 17 ऑक्टोबरपर्यंत शालीमार एक्सप्रेस रद्द, जाणून घ्या कारण

यावेळी दोन्ही पंथीयांच्या भक्तांनी मंदिरा बाहेर ठिय्या मांडल्याचे दिसून आले. प्राथमिक माहितीनूसार काही महिन्यांपूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने (court) काही अटी शर्तींवर भक्तांसाठी मंदिर उघडण्याची परवानगी दिली होती.

हे मंदिर उघडल्यानंतर लेपन प्रक्रियेवरुन वाद उफाळून आला होता. प्रशासनाच्या मध्यस्तीने वाद मिटवण्यात आला होता. परंतु आता पुन्हा नव्याने वाद निर्माण झाला आहे.

दिगंबर पंथी हे मंदिर परिसरात असलेले लोखंडी बरिकेट काढण्यासाठी आक्रमक झाले होते. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर दाेन्ही गट शांत झाले. या मारामारीत तीन जण जखमी झाले आहेत. पाेलीसांचा मंदिर परिसरात बंदाेबस्त तैनात आहे.

Edited By : Siddharth Latkar

washim news
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी' उतरली रस्त्यावर, मुंबईला जाणारी साखर, इथेनॉलच्या गाड्या राेखल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com