
फ्रेजरपुरा हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत महिला पोलीस आशा घुले यांची घरात गळा दाबून हत्या.
मृत महिला पोलीस कर्मचारी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या.
हत्येचे कारण अस्पष्ट असून डीसीपीसह पोलीस पथकाने तपास सुरू केला आहे.
दुसऱ्या घटनेत युवा स्वाभिमान पक्षाचे निलेश भेंडे यांच्यावर चाकूने हल्ला.
या दोन्ही घटनांमुळे अमरावतीत भीती व तणावाचे वातावरण निर्माण.
Female police officer Asha Ghule strangled to death : अमरावतीच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. या घटनेनं अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. अशा घुले असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत ३८ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी आशा घुले यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशा घुले या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. तर त्यांचे पती एसआरपीएफमध्ये कर्मचारी आहेत. या हत्येचा तपास सुरू असून डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून संशयितांवर नजर ठेवली जात आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची माहिती मिळताच अमरावतीमधील डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. आशा घुले यांचे पती एसआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. हत्येचे कारण आणि संशयित याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला असून अधिक तपास सुरू केला आहे.
अमरावती शहरात दोन धक्कादायक घटनांनी खळबळ उडाली. महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आल. तर दुसरीकडे अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर चाकूने जीव घेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निलेश भेंडे यांच्या छाती, हात आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रेडियंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांनी अमरावतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दोन्ही प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.