Gokul Milk Price Issue : गोकुळच्या 'त्या' निर्णयावर दूध उत्पादक आक्रमक, 'अमूल' ला प्राधान्य देण्याचा इशारा

farmers morcha at gokul milk office : आज माेर्चा काढून दूध उत्पादक शेतक-यांनी निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
farmers morcha at gokul milk office, kolhapur news
farmers morcha at gokul milk office, kolhapur newssaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : गायीच्या दूधाची दरवाढ झालीच पाहिजे अशा घाेषणा देत आज (मंगळवार) गोकुळ दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघ कार्यालयावर मोर्चा काढला. गाेकुळ संघाने गाय दूध दरात कपात केल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. दरम्यान या आंदाेलनाप्रसंगी पाेलीसांचा गाेकुळ परिसरात बंदाेबस्त हाेता. (Maharashtra News)

farmers morcha at gokul milk office, kolhapur news
Sangli News : सुमनताई पाटील उपाेषण साेडणार? शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फाेन, राेहित पाटील म्हणाले...

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने (Gokul Milk Price) म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्याची माहिती नुकतीच अध्यक्ष अरुण डाेंगळे यांनी दिली. त्यानूसार म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.

farmers morcha at gokul milk office, kolhapur news
Success Story : दुग्ध व्यवसायातून प्रगती, महिन्याला साडेपाच लाखांचे उत्पन्न; वाचा साळुंबरेतील शेतकऱ्याची यशाेगाथा

ही दरवाढ रविवारपासून (ता १ ऑक्टोबर) दुध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्या व जिल्ह्याबाहेरील दुध उत्पादकांना लागू करण्यात आली आहे. दरम्यान गाय दूध खरेदी दरात २ रुपये कपात केल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

या नाराजीतून गोकुळ दूध उत्पादकांनी आज गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माेर्चेकरांनी गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करा अन्यथा अमूल मध्ये जाण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.

गोकुळ ही मातृसंस्था, ही संस्था टाकावी म्हणून हक्कासाठी मोर्चा काढतोय. तात्काळ दर पूर्ववत केले नाही तर आमच्याकडे दुसरे पर्याय खुले असल्याचा इशारा देखील शेतक-यांनी (farmers) दिला.

Edited By : Siddharth Latkar

farmers morcha at gokul milk office, kolhapur news
Satara News : सातारा एलसीबीची माेठी कारवाई, 47 लाखांचा गुटखा पकडला, ट्रकही जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com