Solapur: वीज ताेडल्याने १३ गावचे शेतकरी एकवटले; उपकेंद्रालाच ठोकले टाळे

वीज कापल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली.
Lock
Locksaam tv
Published On: 

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातील चिखर्डे येथील वीज उपकेंद्राला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले, चिखर्डेच्या वीज केंद्रावर चालणाऱ्या १३ गावच्या शेतकऱ्यांची (farmers) वीज विद्युत केंद्राने कुठलीही पूर्व सूचना न देता कापल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत वीज उपकेंद्रालाच टाळे ठोकले.

ऐन उन्हाळा सुरू झाला असताना बागायतदार शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. द्राक्ष बागायतदार, कांदा उत्पादक शेतकरी तसेच विविध प्रकारची फळझाडांच्या बागा ऐन भरात आल्या असताना अशा प्रकारे वीज कापल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली.

Lock
Buldhana: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्का जाम आंदाेलनास मध्यरात्रीच प्रारंभ

त्यामुळे १३ गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत उपकेंद्रालाच टाळे ठोकले. यावेळी शेतक-यांनी तेथील अधिका-यांना उपकेंद्रातून बाहेर काढले. यावेळी सुमारे आठशे ते नऊशे शेतकरी उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Lock
पाेलीस कारवाईच्या नाराजीतून मंंत्रालया समोर महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न; अनर्थ टळला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com