परिवारातील सदस्य गावी गेले अन् चोरट्यांनी घरचं खाली केलं!

नवापूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे. घरातील सर्व सदस्य गावी गेलेले असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील चार ते पाच लाखांचे ऐवज लंपास केला आहे.
परिवारातील सदस्य गावी गेले अन् चोरट्यांनी घरचं खाली केलं!
परिवारातील सदस्य गावी गेले अन् चोरट्यांनी घरचं खाली केलं!दिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार:- नवापूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे. साईनगरीत घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. घरातील सर्व सदस्य गावी गेलेले असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील चार ते पाच लाखांचे ऐवज लंपास केला आहे. रोख रकमेसह दागदागीने चोरले. ही बाब समोर येताच नवापूर पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

साई नगरीतील पुरोहित उल्हास यशवंत पाथरकर या आपल्या कुटुंबिंयांसमवेत राहतात. रात्री त्यांच्या घरात पुजाविधी कार्यक्रमाची तयारी करून त्याचे तिन्ही बंधू 11 वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच कडी कोंडा तोडून घरातील काळ्या रंगाची बॅग मधील 30 ते 40 हजार रोख रकमेसह सोन्याचे 8-10 तोळे दागदागीने लंपास केले आहे.

परिवारातील सदस्य गावी गेले अन् चोरट्यांनी घरचं खाली केलं!
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर होमगार्डचा मोर्चा

शुक्रवारी पुजाविधी करण्यासाठी हेमंत पाथरकर, गिरिश पाथरकर, अजित पाथरकर घरी आले असता. गेटचे व घराच्या दरवाज्याचे लॉक तोडलेले दिसले. लगेच पोलिसांना फोन केला त्यानंतर घराची पाहणी केली असता घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. किचन मधील पकड, कैचीचा वापर करत बेडरूममधील कपाट फोडले कपाटातील रोख रकमेसह दाग दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

साईनगरीत चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेचा पंचनामा देखील करण्यात आला आहे. लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. रात्री दोन वाजून 50 मिनिटांनी पोलिस गाडी साईनगरीतून गेलेली आहे. सीसीटीव्ही मध्ये पोलिस गाडी दिसून आली चोरटे मात्र दिसून आले नाही. चोरटे सराईत आणि जाणकार चोर असल्याचे बोलले जात आहे. नवापूर शहरात पोलिस गस्त घालत असले तरी चोरी चे प्रकार वाढतच आहे यावर ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com