जत्रेसाठी बकरा दिला नाही, अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

dombivli news : जत्रेसाठी बकरा दिला नसल्याच्या कारणातून अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
dombivli news
dombivliSaaam tv
Published On
Summary

डोंबिवलीत घडला धक्कादायक प्रकार

टोळक्याकडून कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण

डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांत गुन्हा दाखल

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. डोंबिवलीत जत्रेसाठी बकरा दिला नसल्याने एकाच कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत गावदेवीची जत्रा सुरू आहे. डोंबिवलीच्या कुंभारखान परिसरात राहणारे आशिष विठ्ठल दळवी यांचा तबेला आहे. त्यांच्या तबेल्यात बकरी आणि म्हशी आहेत. परिसरात जत्रा सुरू असल्याने नागरिकांनी उत्साहात जत्रा साजरी केली. मात्र रात्री अडीच वाजताच्या सुमारास आशिष दळवी यांच्या तबेल्यात सुजल भोसले नावाचा तरुण आला.

dombivli news
Sambhajinagar : इथं फक्त कायद्याचा बालेकिल्ला; जिथं दहशत माजवली, तिथंच धिंड काढली; संभाजीनगर पोलिसांची 'दबंगगिरी'

सुजलने आशिषला सांगितले की, मला बकरा दे'. त्यानंतर आशिषने सांगितले की, ठिक आहे. उद्या सकाळी या. आईला सांगून ठेवतो. तुम्ही बकरा घेऊन जा'. परंतु या गोष्टीचा सुजलला राग आला. काही वेळात सुजल भोसले हा त्याचा मित्र विनय हेगडे, प्रमोद ठाकरे, यज्ञेश खंडागळे, अक्षय खंडागळे आणि अन्य दोन साथीदारांसोबत आला.

सुजलने मित्रांच्या साथीने आशिषला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आशिषची आई आणि मोठा भाऊ देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

dombivli news
तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

डोंबिवलीत स्टंटबाजांना केली अटक

डोंबिवलीत सोशल मीडियावर रील बनविण्याच्या नादात तीन तरुणांनी थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार केला होता. ठाणे-डोंबिवलीला जोडणाऱ्या माणकोली उड्डाणपुलावर हा प्रकार घडला होता. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी तिन्ही स्टंटबाज तरुणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिघे तरुण एकाच दुचाकीवर बसल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com