Fact Check: खरंच फक्त २०० रुपयांचेच पेट्रोल मिळणार, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? सरकारने दिली महत्वाची अपडेट

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळ राज्यातील अनेक जिल्हा प्रशासनाने पेट्रोल भरण्यावर मर्यादा आणली होती. यासंदर्भातील मेसेज व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे? घ्या जाणून...
Fact Check: खरंच फक्त २०० रुपयांचेच पेट्रोल मिळणार, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? सरकारने दिली महत्वाची अपडेट
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

Summary -

  • २०० रुपयांची पेट्रोल मर्यादा ही अफवा

  • सरकारकडून अधिकृतपणे दावा फेटाळला

  • काही ठिकाणी तात्पुरते निर्बंध लागू

  • अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढली

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतात होत आहे. या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या असून तुटवडा देखील आहे. अशात पेट्रोल-डिझेलचा साठा संपल्याच्या अफवा पसरल्या आहेत त्यामुळे नागिरकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठ्या रांगा लावून टाक्या फुल करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्हा प्रशासनाने पेट्रोल भरण्यासंदर्फभात नवा नियम काढला.

दुचाकींना फक्त २०० ते चारचाकींना २००० रुपयांचे पेट्रोल भरता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. हा मेसेज आता राज्यभरात सगळीकडे व्हायरल होत असून नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. यावर आता महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची अपडेट दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करत या व्हायरल मेसेजमागचे सत्य सांगितले. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, 'सरकारने पेट्रोल खरेदीवर २०० रुपयांची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या. पेट्रोल खरेदीवर २०० रुपये अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही.'

Fact Check: खरंच फक्त २०० रुपयांचेच पेट्रोल मिळणार, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? सरकारने दिली महत्वाची अपडेट
Petrol-Diesel: पेट्रोल टंचाईची अफवा! टाक्या, हांडे अन् कॅन घेऊन नागरिक पोहचले पेट्रोल पंपावर; पाहा VIDEO

दरम्यान, हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरूवारी आदेश काढले होते की, दुचाकींना पेट्रोल पंपावर फक्त २०० रुपयांचे पेट्रोल भरता येईल. तर तीन आणि चार चाकी वाहनांना २००० रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेल भरता येईल. त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने पेट्रोल- डिझेलवरती लावलेले निर्बंध मागे घेतले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी २४ तासानंतर पुन्हा आदेश दिले. हिंगोलीत इंधन परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही, समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागलेल्या आहेत. कुणी टाक्या, हंडे, कॅन घेऊन पेट्रोल पंपावर आले आहेत. परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पेट्रोल-डिझेल खरेदीवर मर्यादा आणण्यात आली आहे.

Fact Check: खरंच फक्त २०० रुपयांचेच पेट्रोल मिळणार, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? सरकारने दिली महत्वाची अपडेट
Petrol-Diesel: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com