Exit Poll Maharashtra : जुन्नरचा 'शेर' कोण? बंडखोरीचा फटका कुणाला बसणार? पाहा व्हिडिओ

SAAM Exit Poll : जुन्नर मतदारसंघात बंडखोरीमुळं कोण आमदार होणार? सत्यशील शेरकर की अतुल बेनके? एक्झिट पोलचा कौल कुणाला ? वाचा सविस्तर
Junnar Vidhan Sabha, Satyashil Sherkar vs Atul benke
Junnar Vidhan Sabha, Satyashil Sherkar vs Atul benkeSaam tv
Published On

रोहिदास घाडगे, साम टीव्ही प्रतिनिधी

Junnar Vidhansabha Saam Exit Poll : जुन्नर मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पारडे जड दिसून येत आहे. शरद पवार गटाकडून सत्यशील शेरकर Satyashil Sherkar हे संभाव्य आमदार असणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अतुल बेनके यांना संधी देण्यात आली होती. मात्र, या मतदारसंघात शेरकर हे 'शेर' ठरू शकतात.

जुन्नर मतदारसंघात (Maharashtra Assembly Election )महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना महायुतीतील घटकपक्षांनी बंडखोरी केली. भाजपमधून आशा बुचके, शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार शरद सोनावणे आणि राष्ट्रवादीकडून देवराम लांडे यांनी बंडाचे निशाण फडकावलं. याचा फटका महायुतीचे उमेदवार बेनके यांना बसल्याचे दिसून येते. दुसरीकडे या बंडखोरीचा फायदा शेरकर यांना होताना दिसत आहे.

Junnar Vidhan Sabha, Satyashil Sherkar vs Atul benke
Exit Poll Maharashtra : अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी पुन्हा आमदार? पाहा एक्झिट पोल

प्रचाराच्या काळात वैयक्तिक पातळीवर टीका झाली. विकासकामांचा प्रचार होईल अशी अपेक्षा असताना वैयक्तिक पातळीवरील टीकेचा विषय चर्चेचा ठरला. संभाव्य आमदार म्हणून शेरकर यांच्याकडे पाहिलं जातं. आता एक्झिट पोलमधील हा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच नक्की या मतदारसंघाचा 'शेर' कोण हे ठरणार आहे.

Junnar Vidhan Sabha, Satyashil Sherkar vs Atul benke
Saam Exit Poll: आमगावमधून संजय पुरम होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com