मुंबई : अंदमान निकोबारमध्येही रिपब्लिकन पक्षाचा विस्तार करण्यात आला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. अंदमान निकोबारमधील सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाचे संघटन येथे मजबूत करणार आहे.
येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आरपीआय एनडीए भाजपची सत्ता निश्चित येणार असल्याचा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
पोर्टब्लेयर येथील डॉ. बी.आर. आंबेडकर ऑडिटोरियम येथे रिपब्लिकन पक्षाच्या अंदमान निकोबार प्रदेशच्या शाखेच्या स्थापनेनिमित्त आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.
यावेळी अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशच्या रिपब्लिकन पक्षाची कार्यकारिणी रामदास आठवले यांनी जाहीर केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या अंदमान निकोबार केंद्रशासीत प्रदेशच्या अध्यक्षपदी राहुल राम यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
तर सरचिटणीस पदी संदीप लाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अंदमान निकोबार प्रदेशच्या रिपाइं युवक आघाडीच्या अध्यक्षपदी गुरप्रीत सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली. (Tajya Batmya)
डॉ. बी.आर. आंबेडकर ऑडिटोरियममध्ये अंदमान निकोबारमधील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यापूर्वी डॉ. बी.आर. आंबेडकर भवन येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. अंदमान निकोबारची भूमी ही ऐतिहासिक असून एक प्रेरणादायी भूमी आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे येथे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृती या अंदमान निकोबारच्या भूमीमध्ये आहेत. येथील सेल्युलर जेलला रामदास आठवले यांनी भेट दिली. (Latest Marathi News)
रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अंदमान निकोबारमधील सर्व जाती धर्मियांना एकत्र आणण्याचे काम आपण करणार आहोत. अंदमान निकोबारला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणार आहोत. कोणत्याही जाती धर्मियांच्या भारतीय व्यक्तीला रिपब्लिकन पक्षात प्रवेश खुला आहे. असे सांगत अंदमान निकोबारमधील जनतेने आगामी 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला साथ देण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.