Sambhajinagar News: पोलिसांच्या हाताला हिसका देत पळाला अन्‌ पडला नाल्‍यात; पोलिसांनी कैद्याला पुन्हा घेतले ताब्यात

पोलिसांच्या हाताला हिसका देत पळाला अन्‌ पडला नाल्‍यात; पोलिसांनी कैद्याला पुन्हा घेतले ताब्यात
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एक आरोपी पोलिसांच्या (Police) हाताला हिसका देऊन पसार झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) येथील घाटी रुग्णालयात घडली. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ माजली होती. (Tajya Batmya)

Sambhajinagar News
Taloda News: भजन म्‍हणतानाच मृत्‍यूने गाठले; अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना निरोप देतानाची घटना

लखन प्रल्हाद मिसाळ असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात ६ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घेऊन आले होते. पण रुग्णालय परिसरात तो पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पसार झाला. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी एकच धावपळ उडाली.

Sambhajinagar News
Nandurbar News: बालविवाह रोखण्यासाठी अनोखी अक्षता मोहिम; जिल्हाभरात ३ महिन्यात रोखले २८ बालविवाह

पळून जाताना पडला नाल्‍यात

पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगार पळाल्याची बाब ऐकून घटनास्थळी एकच गर्दी झाली. यामुळे पोलिसांचेही धाबे दणाणले होते. मात्र आरोपी पळून जात असताना नाल्यात पडला आणि पोलीसांनी नाल्यात उतरुन त्याला पुन्हा ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com