Nandurbar News: बालविवाह रोखण्यासाठी अनोखी अक्षता मोहिम; जिल्हाभरात ३ महिन्यात रोखले २८ बालविवाह

बालविवाह रोखण्यासाठी अनोखी अक्षता मोहिम; जिल्हाभरात ३ महिन्यात रोखले २८ बालविवाह
Nandurbar News Child Marriage
Nandurbar News Child MarriageSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार (Nandurbar) जिल्हा पोलिसांनी महिला दिनापासून जिल्ह्यात अनोखी अक्षता मोहिम राबवून अडीच ते तीन महिन्याच्या काळात तब्बल २८ बालविवाह (Child Marriage) रोखले आहेत. (Latest Marathi News)

Nandurbar News Child Marriage
Jalgaon News: दोन दिवसांपूर्वी झाला विवाह; माहेरी आल्‍यावर प्रियकरासोबत गेली अन्‌..पहाटे समोर आला धक्‍कादायक प्रकार

नंदुरबार जिल्ह्यात माता व बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. पोलीस विभागाच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्यातील कुपोषणही रोखण्यास मदत होत आहे. कमी वयात लग्न (Marriage) झाल्यास त्या मुलीला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तिच्या स्वतःच्या आरोग्यासह कुपोषित बाळ जन्माला येणे, रक्ताची कमतरता भासने, वजन कमी होणे आदी बाबींमुळे मुले व प्रसूतिदरम्यान माता मृत्यूची शक्यता अधिक असते. मुलीचे लग्‍न १८ वर्षांनंतर तर मुलाचे वय २१ वर्ष असावे, असा कायदा देखील आहे. मात्र, बऱ्याच वेळा याचा विचार न होता अज्ञानामुळे पालक आपल्या मुलीचे लग्न करून एकप्रकारे जबाबदारी पूर्ण करीत असतात. मात्र यातून त्या मुलीला भविष्यात मोठा अडचणींचा सामना करावा लागतो.

Nandurbar News Child Marriage
Nashik News: अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतावर रोप वे; पर्यावरण प्रेमींचा मात्र रोप वे होऊ न देण्याचा निर्धार

सर्वच ग्रामपंचायतींमध्‍ये ठराव

या सर्व बाबींचा विचार करून नंदुरबार पोलिसांनी मोहीम हाती घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता मोहीम तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील वाडापाड्यात होणारे बालविवाह थांबविण्याचे मोठे आव्हान होते. कायद्याचा धाक दाखवून बाल विवाह रोखण्यापेक्षा गावकऱ्यांच्या सहभागातून जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्हा पोलीस (Police) प्रमुखांनी गाव पातळीपर्यंत ऑपरेशन अक्षता समित्यांची स्थापना केली. यात ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनाही जबाबदारी सोपविण्यात आली. नागरिकांना विश्वासात घेत तब्बल १२६ पेक्षा जास्त गावांमध्ये बैठका घेऊन टीमने जनजागृती केली. यामुळे जिल्ह्यातील एकूण ६३४ पैकी ६३३ ग्रामपंचायतींनी बाल विवाह रोखण्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव कारून सामुहिकपणे बाल विवाह रोखण्याचा निर्धार केला आहे.

Nandurbar News Child Marriage
Sangli News: २० किमी परिघातील गावांना हवी टोलमुक्ती; स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको

हेल्‍पलाईन नंबर सुरू

बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमासाठी ९०२२४५५४१४ हा हेल्पलाईन नंबर जिल्हा पोलीस दलाकडून सुरु करण्यात आलेला आहे. नागरिकांना बैठकांमध्ये कोणत्याही गावात बालविवाह होत असल्यास त्याबाबत हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क करून माहिती देणेबाबत आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे. याचेही परिणाम दिसू लागलेला आहे. जागृत गावकरी पोलीसांन माहिती देऊ लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com