
मराठी डिजिटल पत्रकारितेत आपल्या विश्वासार्हतेची आणि दर्जेदार बातमीदारीची परंपरा जपत ई-सकाळने पुन्हा एकदा मोठं यश मिळवलं आहे. मे महिन्यानंतर जून २०२५ मध्येही ई-सकाळने महाराष्ट्रातील नंबर एक डिजिटल न्यूज पोर्टल ठरलं आहे. कॉमस्कोर या आंतरराष्ट्रीय डिजिटल विश्लेषण संस्थेने नुकताच जाहीर केलेल्या जून २०२५ च्या रिपोर्टनुसार, २१.२ दशलक्ष (मिलियन) युनिक वाचकांनी या महिन्यात ई-सकाळला भेट दिली आहे.
हे केवळ आकड्यांचं यश नाही, तर हे वाचकांच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रमाण आहे. या दुसऱ्या सलग महिन्यात eSakal.com ने लोकमत, एबीपी माझा, टीव्ही नाईन मराठी, लोकसत्ता यांसारख्या दिग्गज न्यूज पोर्टल्सना मागे टाकत आघाडी कायम ठेवली आहे. हे यश मिळवण्यासाठी ई-सकाळच्या संपूर्ण टीमने झोकून देऊन काम(Work) केलं असून, हे यश त्यांच्या अथक परिश्रमांचे आणि नविन प्रयोगांचे मूर्त स्वरूप आहे.
ई-सकाळने गेल्या काही महिन्यांत वाचकांच्या गरजा ओळखून आपल्या सामग्रीत आणि सादरीकरणात मोठे बदल केले आहेत. सातत्यपूर्ण आणि जलद अपडेट्स, अचूक आणि विश्वासार्ह माहिती, आकर्षक वेबस्टोरीज आणि सर्जनशील मांडणी या सर्व घटकांमुळे वाचकांनी ई-सकाळला भरभरून प्रतिसाद दिला आहे. याशिवाय ई-सकाळने आपल्या बातम्यांच्या सादरीकरणातही बदल केले आहेत. इनोव्हेटिव्ह फॉरमॅट्स, व्हिज्युअल स्टोरीज, व्हिडीओज आणि सोशल मिडियाच्या ट्रेंडनुसार खास वेबसिरीजचा समावेश केल्यामुळे युवा वाचकवर्गाचा ओढा वाढत आहे.
सकाळ(Sakal) ग्रुपच्या गेल्या अनेक दशकांच्या अनुभवाचा लाभ घेत ई-सकाळने महाराष्ट्रभर नव्हे तर परदेशातही असलेल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली आहे. हायपरलोकल कंटेंट, स्थानिक भाषेतली भाष्यं, गावागावातल्या बातम्या आणि स्थानिक पातळीवरचे प्रश्न अधोरेखित करण्याच्या प्रयत्नांमुळे ई-सकाळ विविध वयोगटांतील आणि भौगोलिक स्तरांतील वाचकांसोबत अधिक घट्ट नातं जोडू शकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.