Sakal Digital : डिजिटल युगाची 'सुवर्ण' सकाळ! रौप्य महोत्सवी वर्षातच वॅन इन्फ्राकडून सन्मान

WANIFRA Award : सकाळ प्लस या उपक्रमाला ‘वॅन-इफ्रा’चा जागतिक सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. सकाळच्या दर्जेदार पत्रकारितेला वाचकांनी आंतरराष्ट्रीय पाठिंबा दिला आहे.
WANIFRA Award
Sakal Digital Saam tv
Published On

पुणे : दर्जेदार, निष्पक्ष वार्तांकनाच्या पाठिशी वाचक नेहमी भक्कमपणे उभे राहतात, याची प्रचिती ‘वॅन - इफ्रा’च्या जागतिक पातळीवरील डिजिटल मीडिया पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा आली आहे. ‘सकाळ प्लस’ या प्रीमियम मजकुरासाठीच्या उपक्रमाला ‘वॅन-इफ्रा’चे सुवर्ण पारितोषिक मिळालंय. वाचकांच्या हिताचा आणि दर्जेदार पत्रकारिता आणि सखोल सखोल विश्‍लेषणात्मकासाठी सबस्क्रिप्शन मॉडेल स्वीकारणारं ‘सकाळ’हे मराठीमधील पहिलंच माध्यम समूह आहे. वाचकांनीही या उपक्रमावर पसंतीची मोहोर उमटवल्याचेच ‘वॅन-इफ्रा’च्या या पुरस्कारातून प्रतिबिंबित होत असल्याचे दिसत आहे.

यंदा ‘ई-सकाळ डॉट कॉम’ हे ‘सकाळ’ची वेबसाईट रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. गेल्या २५ वर्षांत बदलत्या डिजिटल विश्वाशी सुसंगत धोरणे स्वीकारत ‘सकाळ माध्यम समूहा’ने ऑनलाइन पत्रकारितेमध्ये नवनवीन प्रयोग केले. 'ई-सकाळ', 'ॲग्रोवन', 'सरकारनामा', 'दैनिक गोमंतक', 'साम' अशा विविध वेबसाईटच्या माध्यमातून वाचकांना विश्वासार्ह माहिती देण्याची परंपरा कायम राखण्यात आलीये.

पत्रकारितेत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत वाचकांना समृद्ध अनुभव देण्याचा प्रयत्न 'सकाळ' तर्फे सातत्याने केले जातेय.‘ई-सकाळ डॉट कॉम’ने राबवलेले सबस्क्रिप्शन मॉडेल, हे वाचकांना केंद्रस्थानी ठेवत पत्रकारितेच्या मूल्यांशी तडजोड न करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. त्यालाही वाचकांनीही भरभरून साथ दिली.

WANIFRA Award
Uddhav Thackeray : ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपचं महाराष्ट्रातून नामोनिशान पुसून टाकू; उद्धव ठाकरेंची डरकाळी

‘वॅन-इफ्रा’ या जागतिक पातळीवरील संघटनेने डिजिटल मीडिया पुरस्कारांच्या विभागात ‘सकाळ प्लस’ या प्रयोगाचा सन्मान केलाय. यापूर्वी हा पुरस्कार ‘बीबीसी’, ‘डेस स्पिगल’,‘द न्यूयॉर्क टाईम्स’, ‘द गार्डियन’यांसारख्या माध्यम समूहांना मिळालाय.

‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवर मिळालेली ही मान्यता म्हणजे ‘सकाळ माध्यम समूहा’साठी अभिमानास्पद टप्पा आहे. 'सकाळ'च्या या विश्वासार्ह पत्रकारितेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना अधिक बळ मिळालंय.’

WANIFRA Award
Sanjay Raut : सरेंडर होण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल,VIDEO

विश्वासार्हता, नावीन्यपूर्ण कल्पना यांचा मिलाफ म्हणजे 'सकाळ प्लस'ला मिळालेले यश' असे वर्णन ‘सकाळ’च्या संचालक जान्हवी पवारांनी केले. त्या म्हणाल्या, 'वॅन-इफ्रामध्ये मिळालेला पुरस्कार म्हणजे वाचक केंद्रस्थानी ठेवत मजकूर तयार करण्याची आमची धोरणे यशस्वी होताहेत. त्यावर आता शिक्कामोर्तबच झालं आहे. डिजिटल पत्रकारितेत नवनवीन प्रयोग करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या 'सकाळ'मधील सर्व सहकाऱ्यांचा यशात वाटा आहे.’

WANIFRA Award
Barvi Dam water Level : ठाण्यात कोसळधार! जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या धरणात पाणीसाठा वाढला, बारवी धरण किती टक्के भरलं?

‘हा केवळ पुरस्कार नव्हे तर 'दर्जेदार आणि नि:पक्ष वार्तांकनाला वाचक पाठिंबा देतात. या आमच्या विश्वासाला जागतिक पातळीवर मिळालेली पावतीच आहे. चांगल्या मजकुरासाठी वाचक पैसे खर्च करण्यास तयार असतात. या विश्वासानेच आम्ही 'सकाळ प्लस'ची सुरुवात केली. या प्रवासात आमची साथ दिलेल्या प्रत्येक वाचकाचाही या पुरस्काराने गौरव झाला आहे, असे डिजिटल बिझनेस हेड स्वप्नील मालपाठक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com