

Solapur News: कर्नाटकहून दिल्लीकडे निघालेल्या रेल्वे स्टेशनच्या इंजिनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटक एक्सप्रेसच्या पुढच्या डब्यात तांत्रिक बिघडमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत असून या आगीमध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.
स्थानिकांच्या मदतीने आग विझवून ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना झाली असून या आगीच्या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या केके रेल्वे एक्स्प्रेसच्या इंजिनला आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. मोहोळ - कुर्डुवाडी रेल्वे रुळावरील घाटणे परिसरामध्ये रेल्वे इंजिन डब्याने अचानक पेट घेतला.
चालकाला इंजिनमधून येणारा धुर दिसू लागल्याने प्रसंगावधान ओळखून त्याने गाडी तात्काळ थांबवली. चालकाने स्वतः ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये त्याच्या हाताला तसेच अंगाला भाजले. याबद्दलची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी मदत केली. अग्नीशमन यंत्रणेद्वारे आग विझवली गेली.
दरम्यान, आग विझवल्यानंतर दुसऱ्या इंजिनाच्या मदतीने गाडी पुढील प्रवासासाठी दिल्लीला रवाना झाली. दोन तासांनी गाडी पुन्हा मार्गस्थ झाल्याने रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.