Fact Check : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा 'सोशल'वर व्हायरल; खरं काय? जाणून घ्या

viral message about maharashtra assembly election : महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल तारखा खऱ्या की खोट्या यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा सोशलवर व्हायरल; खरं काय? जाणून घ्या
Fact Check Saam tv
Published On

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुका पार पडून नवे सरकारही विराजमान झालं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यादरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या तारखा खऱ्या की खोट्या यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रासहित हरियाणाच्याही विधानसभा निडवणुकांच्या तारखा व्हायरल झाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीचा स्क्रीन शॉट व्हायरल केला जात आहे. निवडणुकांच्या व्हायरल तारखांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या व्हायरल मेसेजनंतर निवडणूक आयोगाने ट्विट करत महत्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा सोशलवर व्हायरल; खरं काय? जाणून घ्या
Mouthwash Side Effects Fact Check : माऊथवॉशमुळे कॅन्सरचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या व्हायरल तारखांवर स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणुकांच्या तारखा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निवडणुकींच्या तारखांचा व्हायरल मेसेज व्हाट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज खोटा आहे. अद्याप दोन्ही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. दोन्ही विधानसभेच्या निवडणुका पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा सोशलवर व्हायरल; खरं काय? जाणून घ्या
Budget 2024 Intresting Fact: अर्थसंकल्प लाल रंगाच्या बॅगमधूनच का सादर केला जातो? काय आहे या मागचा रंजक इतिहास? जाणून घ्या

राज्यात विधानसभा निवडणुका कधी?

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यात दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com