गावांत,खेड्यापाड्यात धुरळा उडाला; पुण्यासह १२ ठिकाणी जिल्हापरिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा, मतदान आणि निकाल कधी?

ZP election press conference : गावांत,खेड्यापाड्यात धुरळा उडाला आहे.जिल्हापरिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
Zilla Parishad elections press conference
ZP election press conferenceSaam tv
Published On

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली. मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामुळे राज्याती १२ जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायनुसार ज्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे. अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

Zilla Parishad elections press conference
Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

१२ ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या ठिकाणी निवडणुका होतील.

मतदाराला दोन मते देता येणार

प्रत्येक मतदाराला दोन मते देता येतील. १ मत जिल्हा परिषद आणि १ मत पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी देता येईल. नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाइन प्रक्रिया राहणार असून महापालिका सारखीच होणार आहे. ज्या जागा राखीव आहेत. त्या जागेवर जातवैधता पडताळणी आवश्यक असणार आहे.

Zilla Parishad elections press conference
निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

जातप्रमाणपत्र- उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्याची आवश्यकता असणार आहे. जातप्रमाणपत्र नसेल तर जातपडताळणी समितीकडे अर्ज दाखल केल्याची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. निवडून आल्यावर ६ महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक असणार आहे. जर नाही केलं, तर त्याची निवड रद्द होईल.

निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन - पत्र स्वीकारणे - १६ जानेवारी २६ ते २१ जानेवारी २६

छाननी - २२ जानेवारी

उमेदवारी माघारी अंतिम मुदत - २७ जानेवारी

अंतिम उमेदवार यादी - निवडणूक चिन्ह वाटप - २७ जानेवारी दुपारी साडेतीन नंतर

मतदान - ५ फेब्रुवारी

मतमोजणी - ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com