बाप की कसाई? पोटच्या ७ वर्षाच्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकलं; सरपंचपदासाठी नराधमाने ओलांडली क्रूरतेची सीमा!

Nanded murder case today : नांदेड जिल्ह्यातील केरूर गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अडथळा नको म्हणून नराधम बापाने सात वर्षांच्या मुलीची तेलंगणात नेऊन हत्या केल्याचा आरोप आहे.
Nanded
Nanded Saam
Published On

Father kills daughter for panchayat election in Nanded : नांदेडमध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. निवडणुकीत अडसर नको म्हणून पोटच्या मुलीला बापाने संपवले. तिसरे अपत्या निवडमुकीसाठी अडसर ठरत असल्यामुळे नराधम बापाने ७ वर्षाच्या मुलीची तेलंगणाच्या हद्दीत हत्या केली. नांदेडमधील केरूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आरोपी बापाला गावातील निवडणूक लढवायची होती. पण तिसरे अपत्य यात अडथळा ठरत होती, त्यामुळे लेकीचा जीव घेतल्याची संतापजनक घटना घडली. या कटात आरोपीची पत्नी, गावातील सरपंचही सहभागी असल्याचे उघड झालेय. आरोपी बापाचे नाव पांडुरंग कोंडामंगले असे आहे. २९ जानेवारी रोजी त्याने पोटची मुलगी प्राचीची हत्या केली. मुलीला दुचाकीला दुचाकीवर घेऊन तेलंगणामध्ये घेऊन गेला. तिथे कॅनोलमध्ये बुडवून मुलीचा जीव घेतला. आर्थिक विवंचनेतून हत्या केल्याचे आधी त्याने बतावणी केली. पण नंतर वास्तव समोर आले.

आरोपीला तीन आपत्य आहेत आणि सरपंच पदाची तयारी सुरू केली होती. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पांडुरंग कोंडामंगले (वय 32) असं आरोपी पित्याच नाव आहे. आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे कटिंगची दुकान असून त्याला तीन आपत्य आहे. तीन दिवसा पूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरीएकटाच परत आला.

Nanded
Today Gold Rate : सोनं प्रति तोळा ₹९८०० नी झालं स्वस्त, तर चांदीत ५३ हजारांची घट; वाचा सुवर्णनगरीतील 22k, 24k चे दर

इकडे केनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील चौकशीत संशय बळावल्याने ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोललं जातं आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तीन अपत्य असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरू आहे. हत्येच नेमकं कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.

Nanded
Ajit Pawar Death : अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नवे तर 'या' गोष्टीमुळे पटली, तपासात मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com