Local Body Election: विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नकोच, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा स्वबळाचा नारा

Maharashtra Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदाराने स्वबळाचा नारा दिला आहे. विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नकोच, असा निर्धार त्यांनी केला आहे.
Local Body Election: विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नकोच, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा स्वबळाचा नारा
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली

  • 'विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नको' असा ठाम नारा त्यांनी दिला

  • जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघात त्यांनी ही घोषणा केली

  • या निर्णयामुळे महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशात 'विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नको', असं म्हणत एकनाथ शिंदेंच्या आमदाराने स्वबळाचा नारा दिला आहे. आपण युतीच्या नव्हे तर आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जे सातत्याने आपल्या विरोधात लढले अशांच्या सोबत युती करणार का? असा सवाल करत शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात आमची शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचं घोषित केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव जिल्ह्यात पहिला मिठाचा खडा पडल्याचे पाहायला मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकासंदर्भात आपली भूमिका जाहीर केली.

Local Body Election: विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नकोच, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा स्वबळाचा नारा
Local Body Election : गावागावात यंदा राजकीय दिवाळी! झेडपी, पंचायत समिती निवडणुकांचा बार दिवाळीतच फुटणार

'आगामी काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढण्याच्या बाबत महायुतीचे नेते सांगत असले तरी आजपर्यंत जे आपल्याविरोधात लढले ते पुन्हा एकदा आपल्या विरोधात एकत्र येऊन आपला पराभव कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत, अशांसोबत आपण युती कशी करणार? ', असा सवाल किशोर पाटील यांनी उपस्थित केला.

Local Body Election: विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नकोच, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा स्वबळाचा नारा
Local Body Election : मिनी विधानसभेसाठी भाजपची नवी रणनीती, ठाकरे-पवारांना देणार धक्क्यावर धक्के, राज्याच्या राजकारणात भूकंप होणार

तसंच 'आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघात आपण महायुती नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार आहोत आणि त्यामध्ये आपला शिवसेनेचा भगवा झेंडा विजयी झालेला दिसेल.', अशी भूमिका शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले. किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे राज्यात महायुतीमध्ये पुढील काळात काय चित्र राहू शकते याचा अंदाज या घटनेवरून येत आहे.

Local Body Election: विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नकोच, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा स्वबळाचा नारा
Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com