एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; शेकडो नाराज शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ncp news : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. रायगड, खोपोलीमधील शेकडो नाराज शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
khopoli political news
khopoli Saam tv
Published On
Summary

शिंदेंच्या शिवसेनला बसला मोठा धक्का

महायुतीतच फोडाफोडी सुरू

नाराज शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सचिन कदम, साम टीव्ही

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडी सुरूच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीमध्येच जोरदार चुरस पाहायला मिळाली. महायुतीत भाजपचा वरचष्मा पाहायला मिळाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही चांगली कामगिरी केल्याचे दिसून आलं. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली होती. या निवडणुकीनंतर आता महायुतीतच फोडाफोडी सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर नाराज झालेल्या शेकडो शिवसैनिकांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

खोपोलीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसला आहे. खोपोलीतील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत सुनील तटकरे यांच्याशी आमदार महेंद्र थोरवे यांनी हातमिळवणी केल्याचे दिसून आलं. या हातमिळवणीचा फटका थोरवे यांना बसला आहे.

khopoli political news
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला; सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना म्हणजे महेंद्र थोरवे यांचा बालेकिल्ला असलेल्या खोपोलीमध्ये शेकडो शिवसैनिकांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार थोरवे यांना हा मोठा धक्का मनला जातो आहे.

राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद हा सर्वश्रृत आहे. मात्र कोकण विधानपरिषद निवडणुकीत आमदार थोरवे हे अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

khopoli political news
शरद पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीतील मोहितेंचा शिवसेनेत प्रवेश? शिंदेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण

आता त्यानंतर शेकडो शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आज शिंदे गटाच्या नाराज शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशावर आमदार महेंद्र थोरवे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आमदार थोरवे काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com