Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

Santosh Bangar news : शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत...मतदान केंद्रावर बांगरांनी नेमकं असं काय केलं? ज्यामुळे बांगरांवर निवडणुक अधिकाऱ्यानं गुन्हा दाखल केलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Santosh Bangar news
Santosh BangarSaam tv
Published On

हे आहेत शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर... मतदान करताना त्यांनी थेट मोबाईल काढून व्हीडीओ शुटींगच केलं...

हिंगोलीतील कळमनुरी नगरपरिषदेत आमदार बांगर मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचले...कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली...त्यानंतर आमदार महोदयांनी मोबाईल काढून मतदानाच्या खोलीत मुक्तसंचारही केला... तेही मोबाईल स्पीकर मोडवर ठेवून...इतकं कमी होतं की काय....

आमदार साहेबांनी थेट मतदान करणाऱ्या महिलेला अडवून काहीतरी कानात सांगण्याचा प्रयत्नहीकेला.. मात्र या कृतीमुळे आमदाक बांगर पुन्हा एकदा चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेत... त्यामुळे मतदान केंद्रातील व्हिडिओची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी केला आणि थेट बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला... दरम्यान बांगराच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केलीय..

Santosh Bangar news
बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

दरम्यान बांगरांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं. त्या केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यावर तत्काळ बदलीची कारवाई होण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय. मुळात निवडणुकीच्या कालावधीत मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा अधिकार फक्त अधिकृत व्यक्तींनाच असतो, अशावेळी मोबाईल घेऊन मतदान केंद्रात फिरण्याचा विशेष अधिकार बांगार यांना कुणी आणि कसा दिला?

Santosh Bangar news
Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

मतदान केंद्रांवर दबावमुक्त वातावरण ठेवणं गरेजचं असताना मतदान केंद्रावर बांगरांनी महिलेला सूचना कशी दिली? निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला धक्का लावल्यावरही निवडणुक अधिकारी मूग गिळून गप्प का बसले होते? या प्रश्नांची उत्तर बांगर यांच्यासह अधिकाऱ्यांनीही देणं गरजेचं आहे.. अन्यथा मतदान केंद्रावरील हे दबावतंत्र लोकशाहीला मारक ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com