आठवलं. आठ दिवसांपुर्वी ६ खासदारांना शिंदेंसेनेत प्रवेश देऊन ऑपरेशन 2.0 फत्ते झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी काय म्हटलं होतं.. आणि हेच आहे ते ऑपरेशन टायगर 3.0..एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना एकामागून एक तिसरा मोठा आणि तितकाच अनपेक्षित धक्का दिलाय. थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातच त्यांची राजकीय नाकेबंदी करण्यासाठी शिंदेंनी हा सर्वात मोठा डाव टाकलाय. ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या सचिन अहिरांनाच शिंदेंनी आपल्या गोटात खेचलंय. इतकंच नाही, तर थेट विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर त्यांची वर्णी लावून मातोश्रीला मोठा हादरा दिलाय. अवघ्या १५ दिवसांत आदित्य ठाकरेंच्या होम ग्राउंडवर शिंदेंनी सर्जिकल स्ट्राईक केलाय.
राजकारणात आजवर कायम सभापती आणि उपसभापती पदावर विश्वासू सहकाऱ्यांची नेमणूक करण्याचा प्रघात आहे. मात्र, शिंदेंनी इथेच मोठी खेळी केली. त्यांनी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या सचिन अहिरांवर विश्वास दाखवला आणि ठाकरेंच्या विश्वासालाच विश्वासानेच शह दिला. पण आता आधीच आमदारांच्या आणि खासदारांच्या अपात्रतेचा निकाल अद्याप प्रलंबित असताना, सचिन अहिर हे एकटेच शिंदेंच्या गोटात गेल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार का? असाही सवाल आहे.
सचिन अहिर हे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचे आमदार
ते जून 2022 मध्ये निवडून आले, तेव्हा शिवसेना संयुक्त होती
मूळ शिवसेना आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थापना नंतर झाली
सचिन अहिरांच्या अपात्रतेचा प्रश्नही उद्भवत नाही
एकनाथ शिंदेंनी अवघ्या १५ दिवसांत 'ऑपरेशन टायगर ३' फत्ते करत ठाकरेसेनेच्या थेट मर्मावर घाव घातलाय. या संपूर्ण घडामोडीत अखेरच्या क्षणापर्यंत राखलेली गुप्तता ही ठाकरे गटासाठी अनपेक्षित ठरली. राज्याच्या राजकारणात सध्या कधी काय घडेल, याचा नेमका अंदाज बांधणंही अशक्यये. ऑपरेशन टायगर ३ च्या माध्यमातून आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात सुरुंग लावण्यात एकनाथ शिंदेंना यश तर आलंय, पण आता चर्चा सुरू झालीये ती ऑपरेशन टायगर ४ ची. हे पुढचं ऑपरेशन नेमकं कधी होणार आणि आता कोणाचं होणार, याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.