'मी एकनाथ शिंदे साहेबांचा पठ्ठा; बॅनर फाडणाऱ्यांना सोडणार नाही'

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे.
Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarSaam Tv
Published On

कोल्हापूर : शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. राज्यातील सेनेच्या आमदारांनी गुवाहाटी गाठली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात राज्यात शिवसैनिकांनी आंदोलन सुरू आहे, अनेक ठिकाणी पोस्टर फाडले आहेत. कोल्हापुरातही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पोस्टर लावण्यात आले होते, पण काही तासातच हे पोस्टर उतरवण्यात आले, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कोल्हापुरातील पोस्टर फाडल्या प्रकरणी माजी आमदार राजेश क्षीरसागर संतापले आहेत.

दोन दिवसापूर्वी कोल्हापूर शहरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर काही तासातच शिवसैनिकांनी उतरवले, या प्रकरणी आज माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला.

Rajesh Kshirsagar
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना आक्रमक; गुवाहाटीला जाणाऱ्या मंत्र्यांचे मंत्रीपद जाणार ?

राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'मी एकनाथ शिंदे यांचा पट्टा, पोस्टर फाडणाऱ्यांना सोडणार नाही. राजेश क्षीरसागर यांचा माजी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांना गुवाहाटीमधून गर्भित इशारा दिला आहे. राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने रविकिरण इंगवले आक्रमक झाले आहेत. इंगवले यांनी शिवसेनेच्या पोस्टर वरील राजेश क्षीरसागर यांचा फोटो फाडला असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इंगवले यांच्या कृत्याला राजेश क्षीरसागर यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. 'मी सुशिक्षित गुंड, मी बाहेर पडलो तर पळता भुई थोडी करेन, वैयक्तिक द्वेषातून पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, असे राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.

Rajesh Kshirsagar
मतं मागायची असतील तर आपल्या बापाच्या नावावर मागा, बाळासाहेबांचं नाव वापरु नका - संजय राऊत

उद्धव ठाकरे बंडखोरांवर संतापले

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे गट असं नाव देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव वापरणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com