
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणत नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं.
फडणवीस, अजित पवार आणि शिंदे यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग असल्याचं सांगितलं.
मनोज जरांगे आंदोलनानंतर शिंदे रसद पुरवत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या जबरदस्त बॉन्डिग आहे. त्या तिघांना प्रदीर्घ राजकारणाचे ज्ञान असून ते एकमेकांशी चर्चा करतात. ते एकजूट आहेत. ते फडणवीस यांना अडणचीत आणत नाहीत, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. (Ravindra Chavan Clarifies No Rift Between Fadnavis And Eknath shinde)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठं आंदोलन उभारलं होतं. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकारने जीआर काढत जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या. आझाद मैदानातून जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत होते. जरांगे यांच्या आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रसद पुरवत असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलंय.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे तिन्ही वरिष्ठ नेते आहेत. या तिघांना प्रदीर्घ राजकारणाचं अनुभव आहे. त्यांचे एकमेकांचे उत्तम बॉडिंग आहे. त्यामुळे महायुती सरकारचे काम करताना हे तिन्ही नेते एकमेकांशी चर्चा करतात. एकनाथ शिंदे हे आपल्या नजरेतून मराठा आंदोलनाकडे पाहत असतील.
मनोज जरांगेच्या आंदोलनावेळी एकनाथ शिंदे हे वेगळ राहत नव्हते. प्रत्येकाची भूमिका ही वेगळी असते. मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेत असतात. तेव्हा ते दोघांशी बोलत असतात. निर्णय घेताना सर्व मंत्रिमंडळातील नेत्यांशी चर्चा केली जाते. त्यामुळे निर्णय बाहेरून मुख्यमंत्र्याचा वाटत असला तरी सर्वांशी चर्चा केली जाते.
देशात एनडीए सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आहे. दोन्ही सरकार जन हिताचे काम करत आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनकडे नेण्याचं काम चालू असून त्याकडे वाटचाल केली जात आहे. त्याला यश आले पाहिजे, जेणेकरून राज्यातील सर्व क्षेत्रातील प्रत्येकाला त्याला फायदा झाला पाहिजे, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.