Eknath Khadse Video: विधानसभेआधी भाजपमध्ये मोठ्या हालचाली, एकनाथ खडसेंकडे लवकरच मोठी जबाबदारी

Eknath Khadse Join BJP: भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलीय. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने रोडमॅड ठरवला आहे. याचपार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश लवकरच केला जाणार आहे.
Eknath Khadse: विधानसभेआधी भाजपमध्ये मोठ्या हालचाली, एकनाथ खडसेंकडे लवकरच मोठी जबाबदारी
Eknath Khadse Join BJP
Published On

लोकसभेच्या पराभवानंतर भाजप विधानसभेच्या तयारीला लागलीय. त्यापार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. मंगळवारी दिल्लीत झालेल्या कोअर बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरवण्यात आला. आता हाती आलेल्या माहितीनुसार, लवकरच एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश केला जाणार आहे. भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

लोकसभा निवडणुका होण्याआधीच खडसेंनी घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यांच्या भाजप प्रवेशाचा मर्हूत लागलेला नाहीये. आता हाती आलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीच्या आधीच खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण रक्षा खडसे हे निवडून येतील तेव्हाच त्यांचा प्रवेश केला जाईल, असंही म्हटलं जात होतं.

आता रक्षा खडसे यांचा विजय झाल्याने आता एकनाथ खडसेंना प्रवेश दिला जाणार आहे. पक्षात प्रवेश झाल्यानंतर खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. कारण एकनाथ खडसे आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिलीय. या वृत्तावर बोलतांना बावनकुळेंनी सुचक विधान केलंय. अद्याप खडसेंचा भाजपात प्रवेश झाला नाहीये. ज्यावेळी ते भाजपमध्ये येतील त्यावेळी पाहू असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणालेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पीयूष गोयल, आश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयशावर विचार मंथन करण्यात आले. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. त्यात आता एकनाथ खडसेंच्या प्रवेशाची चर्चा जोर धरू लागलीय. येत्या काही दिवसात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असं म्हटलं जात आहे.

Eknath Khadse: विधानसभेआधी भाजपमध्ये मोठ्या हालचाली, एकनाथ खडसेंकडे लवकरच मोठी जबाबदारी
Eknath Khadse : विजय दिसत नसल्याने विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे; एकनाथ खडसे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com