NDA Govenrment: लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीवरुन एनडीएमध्ये पेच अडकला; चंद्राबाबू नायडूंनी अट घातल्याने वाढला तणाव

Modi 3.0 Lok Sabha Speaker : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात लोकसभा स्पीकर कोण असेल यावरुन भाजप-एनडीएमध्ये रस्सीखेच सुरू झालीय. लोकसभेचा सभापती भाजपचाच असावा, असं मत नितीश कुमार यांनी व्यक्त केलं आहे.
NDA Govenrment: लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीवरुन एनडीएमध्ये पेच अडकला; चंद्राबाबू नायडूंनी अट घातल्याने वाढला तणाव
Modi 3.0 Lok Sabha Speaker HT
Published On

मोदी 3.0 मध्ये लोकसभा अध्यक्ष कोण होणार? यावरून देशातील राजकारण तापलंय. यावेळी देखील केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपला टीडीपी-जेडीयूच्या पाठिंबा दिलाय, त्यामुळे मोदी सरकारला निर्णय घेताना संघर्ष करावा लागत आहे. याचाच अनुभव लोकसभा सभापती कोणाला निवडावे यावरुन येत आहे.

एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला आणि सर्वात मोठा निर्णय हा लोकसभा अध्यक्ष निवडीचा आहे. लोकसभा अध्यक्षपद भाजपला स्वतःकडे ठेवायचा आहे. या निर्णयात नितीश कुमार यांची जेडीयू पक्ष भाजपसोबत आहे, मात्र चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीची म्हणणं मात्र वेगळं आहे. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवर एनडीए सरकारमध्ये पेच निर्माण झालाय.

टीडीपीचे प्रवक्ते पट्टाभी राम कोमरेड्डी यांनी वक्तव्य करून पंतप्रधान मोदी आणि भाजपची चिंता वाढवलीय. भाजप आणि एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या मित्रपक्षांच्या सहमतीनेच लोकसभेच्या अध्यक्षाची निवड व्हायला हवी, असे त्यांनी म्हटलंय. तर टीडीपीच्या मित्रपक्षांसोबत बैठक घेणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी चेहऱ्याचे नाव आले आणि त्यावर एकमत झाले तर भाजपला कळवले जाईल. त्यानंतर एकमत झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षाची निवड केली जाईल असं टीडीपीच्या नेत्यानं सांगितलं आहे.

तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय. कारण जेडीयूला भाजपचा लोकसभा अध्यक्ष होण्यात कोणतीही अडचण नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपी ठाम राहिल्यास भाजप चंद्राबाबू नायडूंची मेहुणी असलेल्या डी. पुरंदेश्वरी यांचे नावाची शिफारस अध्यक्षपदासाठी होऊ शकते.

लोकसभा अध्यक्षांबाबत सुरू असलेल्या गदारोळात राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा रंगलीय. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीने लोकसभा उपाध्यक्ष पदाची मागणी केलीय. हे पद केवळ विरोधकांसाठी असले तरी काँग्रेसने औपचारिकता म्हणून सरकारकडे हे पद मागितलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com